Irfan Pathan : इरफान पठाणने पहिल्याच षटकात फलंदाजाला बाद केले, व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Sep 19, 2022 | 3:40 PM

इरफान गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही उत्तम करीत होता. त्यामुळे इरफानला टीममध्ये अधिक संधी मिळाली आहे

Irfan Pathan : इरफान पठाणने पहिल्याच षटकात फलंदाजाला बाद केले, व्हिडिओ व्हायरल
Irfan-Pathan
Image Credit source: twitter
Follow us on

इरफान पठाणच्या (Irfan Pathan) गोलंदाजीची चुणूक आजही मैदानात पाहायला मिळते. सद्या टीम इंडियाचे (Team India) माजी खेळाडू लीजेंड्स क्रिकेट लीग खेळत आहेत. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. जगभरातील माजी खेळाडू पुन्हा खेळताना दिसत असल्याने त्यांची चर्चा पुन्हा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

इरफान गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही उत्तम करीत होता. त्यामुळे इरफानला टीममध्ये अधिक संधी मिळाली आहे. इरफान आणि युसूफ पठाण या बंधुंनी टीम इंडीयाला अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले आहेत.

सद्या सुरु असलेल्या लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये इरफान पठाणने पहिल्या षटकात एका खेळाडूला बाद केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जगभरातले अनेक खेळाडू हॉटेलमध्ये ठेवले आहेत, तिथले त्याचे गाणे गात असताना किंवा मज्जा करीत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत.

इरफान पठाण आणि सुरेश रैना या दोन्ही तिथं एका हॉटेलमध्ये गाणं गायलं होतं. तो सुद्धा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे.