टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंचे सोशल मीडियावर (Social Media) लाखो फॅन आहेत, त्यामुळे खेळाडूकडून एखादी गोष्ट शेअर केली, की त्याची तिथं चर्चा सुरु असते. आत्तापर्यंत असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. खासगी आयुष्यातील एखादी गोष्ट जरी सोशल मीडियावर शेअर केली, तरी त्याची चर्चा सुरु होते. इरफान पठानच्या (Irfan Pathan) काही चाहत्यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरती (Mahendra singh dhoni) जोरदार आरोप केले आहेत.
लेजेंड्स लीगमध्ये सद्या इरफान पठाण चांगली कामगिरी करीत असल्यामुळे पुन्हा तो चर्चेत आला आहे. त्याची खेळी पाहून चाहत्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पठाणने चांगली कामगिरी केली आहे.
इरफान पठाणला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची अधिक संधी मिळाली नाही, ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी त्याने चांगली कामगिरी केली. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली आहे.
इरफान पठाणने वयाच्या 30 व्या वर्षी अंतिम चेंडू खेळला त्याबद्दल मी धोनी आणि टीम मॅनेजमेंटला खूप शिव्या देतो. कारण धोनीला त्यांनी वयाच्या तीसाव्या वर्षी शेवटचा चेंडू खेळवला असा आरोप पठाणच्या चाहत्याने केला आहे.
ही पोस्ट पाहिल्यानंतर इरफान पठाणने स्वत:हून चाहत्याला उत्तर दिले आहे. त्यामध्ये तो म्हणतोय की, कोणालाही याबाबत दोष देऊ नका, प्रेमासाठी धन्यवाद…