Marathi News Sports Ishan kishan became 4th indian receive man of the match award in his debut
PHOTO | शानदार जबरदस्त ! किशनची ‘इशान’दार खेळी, केला सचिन-धोनीसारख्या दिग्गजांना न जमलेला कारनामा
इशान किशनने (Ishan Kishan) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलं. त्याने या सामन्यात 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच (Man Of The Match) पुरस्काराने गौरवण्यात आले.
1 / 6
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 मध्ये 7 विकेट्सने विजय मिळवला. यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या सामन्याच्या विजयाचे हिरो ठरले.
2 / 6
इशानने आपल्या पदार्पणात शानदार कामगिरी केली. त्याने अवघ्या 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. या अफलातून कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. इशान पदार्पणात सामनावीर ठरणारा चौथा भारतीय ठरला.
3 / 6
इशानसाठी हा पुरस्कार महत्वाचा ठरला. कारण इशानसारखी कामगिरी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीलाही आपल्या पदार्पणात करता आली नव्हती.
4 / 6
इशानच्या आधी 3 भारतीयांना पदार्पणात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला आहे. वेगवाग गोलंदाज मोहित शर्माने 2013 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं. या सामन्यात त्याने 10 षटकात 2.60 च्या इकॉनॉमी रेटने 26 धावा देत 2 विकेट्स पटकावल्या होत्या.
5 / 6
पृथ्वी शॉने 2018 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध टेस्ट डेब्यू केलं होतं. त्याने या सामन्यात 154 चेंडूत 134 धावांची शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे पृथ्वीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
6 / 6
फास्टर बोलर नवदीप सैनीने 2019 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध टी 20 डेब्यू केलं. टी 20 कारकिर्दीतील पहिल्या सामन्यात त्याने 4 ओव्हर गोलंदाजी केली. यात त्याने 17 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.