इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा मैदानातच भिडले!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

पर्थ : ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगची शिकार झालेल्या टीम इंडियातच सगळं काही आलबेल नसल्याचं दिसून आलंय. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि इशांत शर्मा मैदानातच भिडल्याचं दिसून आलं. शिवाय दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. मोहम्मद शमीने मध्यस्थी करत हा वाद सोडवला. पर्थ कसोटीत भारताचा 146 धावांनी पराभव झाला. पण संघातील वादामुळेच टीम इंडिया जास्त चर्चेत […]

इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा मैदानातच भिडले!
Follow us on

पर्थ : ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगची शिकार झालेल्या टीम इंडियातच सगळं काही आलबेल नसल्याचं दिसून आलंय. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि इशांत शर्मा मैदानातच भिडल्याचं दिसून आलं. शिवाय दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. मोहम्मद शमीने मध्यस्थी करत हा वाद सोडवला.

पर्थ कसोटीत भारताचा 146 धावांनी पराभव झाला. पण संघातील वादामुळेच टीम इंडिया जास्त चर्चेत आहे. रवींद्र जाडेजाला गेल्या दोन कसोटी सामन्यांपासून बाहेर बसवण्यात आल्याने तो फक्त ड्रिंक ड्युटीवर आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी जाडेजा जेव्हा सब्स्टिट्युटर म्हणून मैदानावर आला होता, तेव्हा दोघांमध्ये वाद झाला.

 

वाद नेमका कशामुळे झाला याबाबत अजून कुणी काहीही बोललेलं नाही. दुसरीकडे भारतीय खेळाडूंची ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबतही चकमक झाली. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण पेनने कोणताही आक्षेपार्ह शब्द वापरला नाही, असं विराटने नंतर स्पष्ट केलं.

https://twitter.com/abhishek2526/status/1074922189990707200

मैदानावर स्लेजिंग करणं ही ऑस्ट्रेलियाची जुनी सवय आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीतून जेव्हा काही केलं जाऊ शकत नाही, तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ स्लेजिंग करुन प्रतिस्पर्धी खेळाडूचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो. असाच प्रकार यावेळीही करण्यात आला. वाचा “मुरली, मला माहितीये एक माणूस म्हणून विराट तुला आवडत नाही”

टीम पेनने आणखी एक आक्षेपार्ह कृत्य केलं. मुरली विजय फलंदाजी करत असताना मागे विकेटकीपिंगसाठी उभा असलेला पेन मुरलीच्या कानात म्हणाला, मला माहितीये तो (विराट कोहली) तुझा कर्णधार आहे आणि एक माणूस म्हणून तुला तो आवडत नाही”. यानंतर मुरलीने काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण लक्ष विचलित झाल्यामुळे काही चेंडू खेळून तो बाद झाला.