महाराष्ट्रातील क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी, भारताच्या ‘ब’ गटात नाशिकच्या लेकीची निवड

| Updated on: Nov 08, 2022 | 8:19 PM

ईश्वरी सावकार ही अष्टपैलू खेळाडू असून महाराष्ट्राच्या संघाचं तीने अनेकदा प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी करत विजय मिळवले आहेत.

महाराष्ट्रातील क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी, भारताच्या ब गटात नाशिकच्या लेकीची निवड
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिकसह महाराष्ट्रासाठी क्रिकेटसाथी आनंदाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. नाशिकमधील अष्टपैलू खेळाडू ईश्वरी सावकार हीची भारताच्या ब संघात निवड झाली आहे. श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेसाठी ईश्वरीची 19 वर्षाखालील गटात ही निवड करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घोषणा झाल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वतावरण निर्माण झाले असून नाशिकच्या क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताच्या विविध क्रिकेटच्या सामन्यात ईश्वरी हिने चमकदार कामगिरी केल्याने तीची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि बीसीसीय आयोजित 19 वर्षाखालील क्रिकेट संघात यापूर्वी निवड झाली होती. महिला टी-ट्वेंटी चॅलेंजर ट्रॉफी सामने गोव्यात पार पडले होते.

त्यात ईश्वरी सावकार इंडिया ए संघाची उपकर्णधार होती . या स्पर्धेत इंडिया ए संघाच्या विजयात 60 धावा आणि 2 बळी अशी अष्टपैलू कामगिरी ईश्वरीने केल्याने इंडिया डी वरील संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.

ईश्वरी सावकार ही अष्टपैलू खेळाडू असून महाराष्ट्राच्या संघाचं तीने अनेकदा प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी करत विजय मिळवले आहेत.

हे सुद्धा वाचा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्याकडून आयोजित विविध स्पर्धांत वेळोवेळी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना केलेल्या फलंदाजीतील जोरदार कामगिरीमुळेच ईश्वरी सावकारची ही निवड झाली आहे.

मागील महिन्यात चंदिगड येथे झालेल्या १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत ईश्वरी सावकारची 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड केलेली होती.
त्यामध्ये तीने ती निवड सार्थ ठरवत कर्णधार आणि सलामीची उकृष्ट फलंदाज म्हणून चांगली छाप पाडली होती.

स्पर्धेतील पाच पैकी तीन सामने महाराष्ट्र संघाने जिंकले होते त्यात ईश्वरी ही सलामीवीर म्हणून पाचही सामन्यांत ईश्वरी सावकारने उत्तम कामगिरी केली आहे.

13 नोव्हेंबरपासून श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धची 19 वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी चौरंगी मालिका वायझाग इथे सुरू होत असून ईश्वरीची त्यात निवड झाली आहे.

त्यामध्ये इंडिया ए व इंडिया बी हे इतर दोन संघ असणार आहे. इंडिया बी चे 13 नोव्हेंबरला श्रीलंका , 15 नोव्हेंबरला इंडिया ए तर 17 नोव्हेंबरला वेस्ट इंडीज बरोबर सामने होणार आहेत.