”जसप्रीत बुमराह…त्यावेळी भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार असेल,” ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूची बुमराहवर स्तुतिसुमनं

| Updated on: Nov 15, 2020 | 11:51 AM

जसप्रीत बुमराहचे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) यांनी कौतुक केलं आहे. (Jason Gillespie praised Jasprit Bumrah )

जसप्रीत बुमराह...त्यावेळी भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार असेल, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूची बुमराहवर स्तुतिसुमनं
Follow us on

मेलबर्न : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) यांनी कौतुक केलं आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेईल तेव्हा तो भारतातील महान गोलंदाज असेल, असं गिलेस्पी यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांनी “जसप्रीत बुमहराह ज्यावेळी क्रिकेटमधून कारकीर्द संपवून निवृत्ती घेईल त्यावेळी सुपरस्टार असेल. बुमराहला क्रिकेटच्या सर्व प्रकारातील भारतातील महान वेगवान गोलंदाज म्हणून ओळखलं जाईल, यामध्ये कोणालाही शंका नसेल”, अशा शब्दात बुमराहचे कौतुक केले आहे. (Jason Gillespie praised Jasprit Bumrah as superstar of Indian cricket)

जेसन गिलेस्पी यांनी जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय वेगवान गोलंदाजांचे कौतुक केलं आहे. भारताकडे यावेळी उत्कृष्ठ वेगवान गोलंदाजांची फळी आहे. सर्वांकडे गोलंदाजीमधील बलस्थानं आणि वेगवेगळी कौशल्य आहेत, असं गिलेस्पी म्हणाले. मोहम्मद शमी उत्कृष्ठ गोलंदाज असून इशांत शर्मानं स्वत:ला सिद्ध केलं आहे. उमेश यादव हा देखील वेगवान मारा करु शकतो आणि भूवनेश्वर कुमार सध्या दुखापतग्रस्त असला तरी त्याची भूमिका देखील महत्वाची आहे, असं गिलेस्पी म्हणाले. भारताला वेगवान गोलंदाजीचा अभिमान असला, पाहिजे, असं जेसन गिलेस्पी म्हणाले.

वेगवान गोलंदाजांची तुलना अशक्य

जेसन गिलेस्पी यांना भारताची वेगवान गोलंदाजी आणि काही वर्षापूर्वींची वेगवान गोलंदाजी याबाबत विचारण्यात आले. गिलेस्पी यांनी अशा प्रकारची तुलना करणं योग्य नाही, असं म्हटलं. भारताकडे यापूर्वी जवागल श्रीनाथ, जहीर खान यांच्यासारखे महान वेगवान गोलंदाज होते, असं म्हटलं

दरम्यान, भारत सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. (India tour to Australia) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड

तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

(Jason Gillespie praised Jasprit Bumrah as superstar of Indian cricket)