सिडनी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (AUS vs IND 3rd Test) यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं (Navdeep Saini) कसोटी पदार्पण केलं आहे. या तिसऱ्या सामन्याच्या सुरुवातीआधी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नवदीप सैनीला टीम इंडियाची कॅप दिली. यावेळी जसप्रीत बुमराहनं नवदीप सैनीला महत्वाच्या तीन गोष्टी सांगितल्या. टीम इंडियाच्या सहकाऱ्यांनी नवदीपचं अभिनंदन केलं. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Head Coach Ravi Shastri) सैनीला शुभेच्छा दिल्या. ( Jasprit Bumrah gave three messages to Navdeep Saini while giving team India cap)
जसप्रीत बुमराहच्या नवदीप सैनीला सांगितेल्या गोष्टी
नवदीप सैनी टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण करणारा 299 वा खेळाडू ठरला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं नवदीपला टीम इंडियाची टेस्ट कॅप सोपवली. यावेळी जसप्रीत बुमराहनं नवदीपला कसोटी क्रिकेट विषयी महत्वाच्या तीन गोष्टी सांगितल्या.
1. कसोटी सामना खेळायला मिळणं ही सन्मानाची बाब आहे. हा सन्मान तुला मिळत आहे.
2. खूप मेहनत घेतल्यानंतर कसोटी सामन्यात खेळायला मिळते.
3. कसोटी सामने खेळायला मिळणं हा तुझा हक्क आहे.
या तीन गोष्टी जसप्रीत बुमराहनं नवदीप सैनीला सांगितल्या.
BCCI चं ट्विट
Congratulations @navdeepsaini96. He realises his dream of playing Test cricket for #TeamIndia today. A proud holder of ? 299 and he receives it from @Jaspritbumrah93. #AUSvIND pic.twitter.com/zxa5LGJEen
— BCCI (@BCCI) January 6, 2021
उमेश यादवच्या जागेवर तीन खेळाडू स्पर्धेत
तिसऱ्या सामन्यासाठी 1 गोलंदाजाच्या जागेसाठी 3 खेळाडू शर्यतीत होते. मात्र बीसीसीआयने नवदीप सैनीला (Navdeep Saini) संधी दिली. नवदीप सैनीला दुखापतग्रस्त उमेश यादवच्या (Umesh Yadav) जागी संघात संधी देण्यात आली आहे. उमेशला ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पदार्पण करणारे खेळाडू
नवदीप सैनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कसोटी पदार्पण करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. रहाणेच्या नेतृत्वात सर्वात आधी कुलदीप यादवने कसोटी पदार्पण केलं होतं. तर यानंतर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या जोडीने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीत पदार्पण केलं. तर आता नवदीप सैनी हा चौथा खेळाडू ठरला आहे.
संबंधित बातम्या:
AUS vs IND 3rd Test | वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण
Australia vs India, 3rd Test, 1st Day : विलो पुकोव्हस्कीचे अर्धशतक, चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया 93-1
(Jasprit Bumrah gave three messages to Navdeep Saini while giving team India cap)