मुंबई : क्रिकेट म्हणजे अनेकांचा आवडता खेळ. भारतासह संपूर्ण जगात क्रिकेट खेळाचे सर्वाधिक चाहते आहेत. वन डे, टी-20, आयपीएल यांसह अनेक क्रिकेटचे सामने सर्वजण अगदी न चुकता बघतात. नुकतंच क्रिकेटच्या विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगत आहे. या विश्वचषकातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी क्रिकेट चाहत्यांसह सर्वचजण उत्सुक आहेत. यामुळे रिलायंन्स जिओद्वारे युजर्सला फी मध्ये सामना पाहता येणार आहे. त्याशिवाय जिओने खास वर्ल्ड कपसाठी काही विशेष ऑफर्सही देण्यात आले आहेत.
काही वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने हॉटस्टारसोबत पार्टनरशीप केली होती. यानुसार जिओच्या ग्राहकांना वर्ल्डकपचे प्रत्येक सामने लाईव्ह आणि मोफत पाहता येणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना आपल्या मोबाईलद्वारेही सामने लाईव्ह पाहता येणार आहे.
त्याशिवाय जिओ टीव्ही अप किंवा हॉटस्टार अपद्वारे ही ग्राहकांना मोफत क्रिकेटची मॅच पाहाता येणार आहे, पण त्यासाठी तुमच्या फोनमध्ये जिओचं सीम कार्ड असण गरजेचं आहे.
तसेच क्रिकेट विश्वचषक 2019 साठी खास रिचार्ज तयार करण्यात आला आहे. या रिचार्जची किंमत 251 रुपये आहे. जर तुमचा रिचार्ज संपला असेल, आणि तुम्ही 251 चा नवीन जिओ रिचार्ज केलात. तर तुम्हाला लाईव्ह मॅच पाहता येईल. तसेच जवळपास 102 जीबी डेटाही तुम्हाला मिळेल. या रिचार्जची वैधता 51 दिवस आहे.