“भारतीय टीमला विराट कोहलीची ग्राऊंड आणि ड्रेसिंग रूममध्ये कमी जाणवेल, विराटच्या गैरहजेरीचा ऑस्ट्रेलियाला फायदा”

| Updated on: Nov 18, 2020 | 1:43 PM

जॉन बुकानन यांनी भारताला विराट कोहलीची ग्राऊंड ते ड्रेसिंग रुमपर्यंत सर्वत्र कमी जाणवणार असल्याचे सांगितले. John Buchanan said team India will miss Virat Kohli

भारतीय टीमला विराट कोहलीची ग्राऊंड आणि ड्रेसिंग रूममध्ये कमी जाणवेल, विराटच्या गैरहजेरीचा ऑस्ट्रेलियाला फायदा
Follow us on

सिडनी : ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी विराट कोहलीच्या कसोटी मालिकेतील सहभागावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीची भारताला ग्राऊंडपासून ते ड्रेसिंग रूमपर्यंत सर्वत्र कमी जाणवणार असल्याचे जॉन बुकानन यांनी सांगितले. बुकानन यांनी गोलंदाजीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाची बाजू भारतापेक्षा वरचढ असल्याचे स्पष्ट केले. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून 27 नोव्हेंबरपासून एकदिवसीय तर  17 डिसेंबर पासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. विराट कोहली अ‌ॅडिलेड येथील पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे. ( Australian Former Coach John Buchanan said team India will miss Virat Kohli during test series)

विराट कोहलीच्या गैरहजेरीचा ऑस्ट्रेलियाला फायदा

जॉन बुकानन यांनी एका भारतीय दैनिकाशी बोलताना विराट कोहलीच्या गैरहजेरीचा ऑस्ट्रेलियाला फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले. विराट कोहली 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळून भारतात परतणार आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीचा ऑस्ट्रेलियाला फायदा होईल कारण भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यापूर्वीच्या मालिकेत विराट कोहलीनं दमदार कामगिरी केली होती. बुकानन यांनी भारतीय संघाला विराट कोहलीची मैदानापासून ते ड्रेसिंग रुमपर्यंत कमी जाणवेल, असं भाकित केलं आहे. ( Australian Former Coach John Buchanan said team India will miss Virat Kohli during test series)

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी मजबूत

जॉन बुकानन यांनी दोन्ही संघाच्या गोलंदाजीची तुलना करताना ऑस्ट्रेलियाची बाजू वरचढ असल्याचे सांगितले. मात्र, यावेळी त्यांनी भारतीय गोलंदाजांची ताकद देखील मान्य केली. बुकानन यांच्या मतानुसार भारताकडे जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी यांची मजबूत गोलंदाजांची फळी आहे. फिरकी गोलंदाचीमध्ये यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची जोडीदेखील चमक दाखवू शकते, असं बुकानन म्हणाले.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाच ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी भारतापेक्षा वरचढ असल्याचे सांगितले होते.

कसोटी मालिका रोमांचक होणार

जॉन बुकानन यांनी 17 डिसेंबर पासून सुरु होणारी कसोटी मालिका रोमांचक होईल, असं म्हटलं आहे. या मालिकेतही दोन्ही संघामध्ये जोरदार लढत होईल, मात्र डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाची बाजू भक्कम असल्याचे बुकानन यांनी स्पष्ट केले.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियन टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .

संबंधित बातम्या :

IND vs AUS | अ‌ॅडिलेडमध्ये कोरोनाने डोकं वर काढलं, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीचं काय होणार?

ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय कसा मिळवायचा, हे आम्हाला चांगलंच माहितीय : चेतेश्वर पुजारा

( Australian Former Coach John Buchanan said team India will miss Virat Kohli during test series)