T20 world cup : बेन स्टोक्स विरुद्ध जोस बटलरची डाव्या हाताने फलंदाजी, व्हिडीओ पाहून…

| Updated on: Oct 12, 2022 | 1:34 PM

ऑस्ट्रेलियात एका मैदानात इंग्लंडचे खेळाडू सराव करीत आहेत.

T20 world cup : बेन स्टोक्स विरुद्ध जोस बटलरची डाव्या हाताने फलंदाजी, व्हिडीओ पाहून...
बेन स्टोक्स विरुद्ध जोस बटलरची डाव्या हाताने फलंदाजी, व्हिडीओ पाहून...
Follow us on

रविवारी सुरु होणाऱ्या विश्वचषक (T20 world cup) स्पर्धेकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. ऑस्ट्रेलियात (Australia) ज्या टीम विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. त्या ऑस्ट्रेलियात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे तिथं खेळाडू मोठ्या प्रमाणात सराव करीत आहेत. त्याचबरोबर अनेक टीम सराव सामने खेळण्यात व्यस्त आहेत. विशेष विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या अनेक खेळाडूंचे (Player) सराव करीत असतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

ऑस्ट्रेलियात एका मैदानात इंग्लंडचे खेळाडू सराव करीत आहेत. तिथं बेन स्टोक्स गोलंदाजी करीत आहे, तर जोस बटलर फलंदाजी करीत आहे. त्यामुळे तिथं विशेष असं आहे की, जोस बटलर हा डाव्या हाताने एकदम जबरदस्त फलंदाजी करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे अनेकांनी त्या व्हिडीओवरती कमेंट केल्या आहेत. तसेच शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.