आयपीएलमध्ये KKR ला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून देणारा स्टार खेळाडू आता ‘या’ स्पर्धेत खेळणार

| Updated on: Mar 05, 2021 | 9:57 AM

केकेआरचा हा गोलंदाज (kkr bowler lockie ferguson) दुखापतीतून सावरला आहे. तो आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे.

आयपीएलमध्ये KKR ला  सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून देणारा स्टार खेळाडू आता या स्पर्धेत खेळणार
केकेआरचा हा गोलंदाज (kkr bowler lockie ferguson) दुखापतीतून सावरला आहे. तो आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे.
Follow us on

मुंबई : लॉकी फॅर्ग्यूनसन (lockie ferguson) न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज. फर्ग्यूसन आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळतो. लॉकी आता आणखी एका संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याने इंग्लंडमधील यॉर्कशायर कल्बसोबत करार केला आहे. तो या कल्बकडून इंग्लंडमधील टी 20 ब्लास्ट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धचे आयोजन हे जूनमध्ये करण्यात येणार आहे. म्हणजेच इथे आयपीएलचा 14 वा हंगाम संपल्यानंतर फर्ग्युसन थेट इंग्लंडसाठी रवाना होईल. न्यूझीलंडच्या या खेळाडूचं सध्या बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टी 20 मालिकेवर लक्ष असणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो या संघासोबत जोडला जाऊ शकतो. सध्या तो फिटनेसवर मेहनत घेत आहे. (kkr bowler lockie ferguson contract with yorkshire for T20 Blast 2021)

करारामुळे फर्ग्यूसन आणि यॉर्कशायर दोन्ही आनंदी

फर्ग्यूसनला आपल्या ताफ्यात घेतल्याने यॉर्कशायर टीम मॅनेजमेंटमध्ये आनंदाच वातावरण आहे. तसेच फर्ग्यूसनही आनंदी आहे. “मी यॉर्कशायरकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. फर्ग्यूसनच्या इंग्लंड काऊंटी क्रिकेटच्या अनेक आठवणी आहेत, अशी प्रतिक्रिया फर्ग्युसनने दिली. फर्ग्युसनने याआधी 2018 मध्ये डर्बीशायर कल्बचं प्रतिनिधित्व केलं आहे. तेव्हा फर्ग्यूसनने 13 सामन्यात 6.64 की इकॉनॉमीसह 16 विकेट्स पटकावल्या होत्या.

“फर्ग्यूसन आमच्यासाठी एक्स फॅक्टर”

फर्ग्यूसन या स्पर्धेतील सर्व सामन्यांसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती आहे. फर्ग्यूसनने टी 20 क्रिकेटमध्ये 2017 मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत. यॉर्कशायरचे कोच एंड्रयू गेल म्हणाले की “फर्ग्यूसनच्या बोलिंगमधील पेस आमच्यासाठी X-Factor असेल. T 20 क्रिकेटमध्ये पेस महत्वाचा घटक असतो. तसेच तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. टी 20 क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हर्स या निर्णायक ठरतात. या ओव्हर्समध्ये तो फार कमी धावा देतात. त्यामुळे ही आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे.”

KKR ला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला

फर्ग्यूसनने आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) कोलकाताला सुपर ओव्हरमध्ये  विजय मिळवून दिला होता. केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. यामुळे हा सामना सुपर ओव्हरद्वारे निकाली निघणार होता. या सुपर ओव्हरमध्ये बोलिंगची जबाबदारी फर्ग्यूसनला देण्यात आली. फर्ग्यूसनने आपल्या या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यामुळे कोलकाताला विजयासाठी 3 धावांचे आव्हान मिळाले. कोलकाताने हे आव्हान सहज पूर्ण केलं. या विजयासह कोलकाताचा आयपीएलच्या 11 वर्षांच्या इतिहासातील सुपर ओव्हरमधील पहिलाच विजय ठरला. याआधी कोलकाताला 2009, 2014 आणि 2019 मध्ये सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

संबंधित बातम्या :

India vs Engalnd 4th Test | कॅप्टन विराट कोहलीला ‘या’ दिग्गज कर्णधाराचा रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी

India vs England 4th Test | कोहलीला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत ‘विराट’ रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी

(kkr bowler lockie ferguson contract with yorkshire for T20 Blast 2021)