चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सवर 38 धावांनी विजय मिळवला आहे. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावाच करता आल्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. तर बंगळुरुकडून कायले जेमिन्सनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. बंगळुरुचा हा या मोसमातील सलग तिसरा विजय ठरला. (KKR vs RCB live score IPL 2021 Match Royal Challengers Bangalore vs Kolkata knight Riders Scorecard online MA Chidambaram Stadium Chennai in Marathi)
बंगळुरुने कोलकाताला पराभूत करत आयपीएलच्या 14 व्या मोसमात सलग तिसरा विजय नोंदवला आहे. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करत 204 धावा केल्या. त्यामुळे कोलाकाताला विजयासाठी 205 धावांचे आव्हान मिळाले. मात्र कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावाच करता आल्या.
That's that from Match No.10.@RCBTweets win by 38 runs to register their third win of the season so far. This is the first time in IPL that the #RCB have won their first 3 games.#VIVOIPL pic.twitter.com/Ei90mgn2iD
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
मोहम्मद सिराजची अफलातून गोलंदाजी, 19 व्या ओव्हरमध्ये दिली फक्त 1 धाव
कोलकाताला विजयासाठी 12 चेंडूत 44 धावांची गरज, सामना रंगतदार स्थितीत
कोलकाताला सातवा धक्का बसला आहे. पॅट कमिन्स आऊट झाला आहे.
कोलकाताला सहावा धक्का बसला आहे. शाकिब अल हसन आऊट झाला आहे.
आंद्रे रसेलने युजवेंद्र चहलच्या बोलिंगवर 17 व्या ओव्हरमध्ये 1 सिक्स आणि 3 चौकारांसह 20 धावा फटकावल्या आहेत.
रसेलने 17 व्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर सिक्स लगावला. त्यानंतर पुढील 3 चेंडूत सलग 3 चौकार लगावले.
आंद्रे रसेलने 17 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर युजवेंद्र चहलच्या बोलिंगवर शानदार सिक्स खेचला आहे.
कोलकाताला विजयासाठी 30 चेंडूत 84 धावांची आवश्यकता आहे. मैदानात आंद्रे रसेल आणि शाकिब अल हसल ही जोडी मैदानात खेळत आहेत.
कोलकाताला पाचवा झटका बसला आहे. कर्णधार इयोन मॉर्गन आऊट झाला आहे. मॉर्गन 29 धावांवर आऊट झाला.
शाकिब अल हसनने सिक्स खेचला आहे. यासह कोलकाताने 100 धावांचा टप्पा पार केला आहे.
कोलकाताने 10 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 83 धावा केल्या आहेत. त्यामुळे कोलकाताला विजयासाठी उर्वरित 10 ओव्हरमध्ये 122 धावांची आवश्यकता आहे.
कोलकाताला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी दिनेश कार्तिकला युजवेंद्र चहलने एलबीडबल्यू आऊट केलं आहे.
कोलकाताला तिसरा धक्का बसला आहे. नितीश राणा आऊट झाला आहे. नितीशने 18 धावांची खेळी केली.
कोलकाताने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 57 धावा केल्या आहेत. कोलकाताने शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठीची विकेट गमावली. मैदानात नितीश राणा आणि कर्णधार इयोन मॉर्गन ही जोडी खेळत आहे.
End of powerplay!
57 runs for @KKRiders
2 wickets for @RCBTweets #VIVOIPL #RCBvKKRFollow the match ? https://t.co/sgj6gqp6tS pic.twitter.com/3o9CysnSw0
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
कोलकाताने दुसरी विकेट गमावली आहे. राहुल त्रिपाठी मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला आहे. राहुलने 25 धावांची खेळी केली.
डॅन ख्रिस्टियनने शानदार कॅच घेत कोलकाताला पहिला धक्का दिला आहे. कोलकाताला शुबमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला आहे. शुबमन गिलने फटकेबाजी करत सुरुवात केली होती. त्याने दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर कायले जेमिन्सनच्या गोलंदाजीवर सलग 2 सिक्स खेचले. पुढील चेंडूवर शुबमनने फटका मारला होता. मात्र तिथे असेलल्या डॅनियल ख्रिस्टियनने हवेत झेपावत शानदार कॅच घेतला. शुबमनने 21 धावांची खेळी केली.
कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कोलकाताकडून नितीश राणा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. कोलकाताला विजयासाठी 205 धावांची आवश्यकता आहे.
एबी डी व्हीलियर्सची फटकेबाजी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले आहे. बंगळुरने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. बंगळुरुकडूने मॅक्सवेलने सर्वाधिक 78 धावा केल्या. तर एबीडीने नाबाद 76 धावांची खेळी केली.
VISION 2️⃣0️⃣0️⃣➕ ✅ #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #DareToDream #RCBvKKR pic.twitter.com/hiTcVWPHjE
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 18, 2021
सिक्स खेचत एबी डी व्हीलियर्सने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. एबीने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
बंगळुरुने चौथी विकेट गमावली आहे. आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आऊट झाला आहे. मॅक्सवेलने 49 चेंडूत 9 फोर आणि 3 सिक्ससह 78 धावांची खेळी केली. ग्लेनने देवदत्त पडीक्कल आणि एबी डी व्हीलियर्ससोबत अर्धशतकी भागीदारी केली.
बंगळुरुने तिसरी विकेट गमावली आहे. देवदत्त पडीक्कल आऊट झाला आहे. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चेंडूवर देवदत्तने मोठा फटका मारला. मात्र त्यात तो अपयशी ठरला. देवदत्त कॅच आऊट झाला. देवदत्तने 25 धावांची खेळी केली.
ग्लेन मॅक्सवेलचे झंझावाती अर्धशतक लगावलं आहे. मॅक्सवेलने 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या दरम्यान मॅक्सवेलने सलामीवीर देवदत्त पडीक्कलसोबत अर्धशतकी भागीदारी करत बंगळुरुचा डाव सावरला.
The Glenn Maxwell show is underway in Chennai as he brings up a fine FIFTY of just 28 deliveries.
Live – https://t.co/Wv7vW3gYrf #RCBvKKR #VIVOIPL pic.twitter.com/fPOGVkLqTe
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
Maxwell on the charge for the @RCBTweets.
A 50-run partnership comes up between @Gmaxi_32 & @devdpd07.
Live – https://t.co/sgj6gqp6tS #RCBvKKR #VIVOIPL pic.twitter.com/w42bzi0Imv
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
बंगळुरुने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 45 धावा केल्या आहेत. बंगळुरुने 6 व्या ओव्हरमध्ये 17 धावा चोपल्या. मैदानात ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडीक्कल खेळत आहेत.
#RCB lose two wickets in the powerplay with 45 runs on the board.
Live – https://t.co/sgj6gqp6tS #RCBvKKR #VIVOIPL pic.twitter.com/1nQEzBy8p8
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
बंगळुरुचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने 6 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला आहे.
बंगळुरुला दुसरा धक्का बसला आहे. रजत पाटीदार आऊट झाला आहे.
बंगळुरुला पहिला धक्का बसल आहे. कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे.
बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.
Match 10. 0.2: H Singh to V Kohli, 4 runs, 5/0 https://t.co/Wv7vW3gYrf #RCBvKKR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
ऑएन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसल, पैट कमिंस, हरभजन सिंह, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.
Match 10. Kolkata Knight Riders XI: S Gill, N Rana, R Tripathi, E Morgan, D Karthik, S Al Hasan, A Russell, P Cummins, H Singh, V Chakaravarthy, P Krishna https://t.co/Wv7vW3gYrf #RCBvKKR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एबी डिविलियर्स, शाहबाज अहमद, ग्लेन मैक्सवेल, वाशिंगटन सुंदर, रजत पाटिदार, मोहम्मद सिराज, युज़वेंद्र चहल ,हर्षल पटेल आणि कायल जेमिन्सन.
Match 10. Royal Challengers Bangalore XI: V Kohli, D Padikkal, R Patidar, G Maxwell, AB de Villiers, W Sundar, S Ahmed, K Jamieson, H Patel, M Siraj, Y Chahal https://t.co/Wv7vW3gYrf #RCBvKKR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
टॉस जिंकून रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने बॅटिंग करण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहजिक कोलकात्याला प्रथम फिल्डिंग करावी लागणार आहे.
रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचा थोड्याच वेळात टॉस होणार आहे.