B.Com करता करता बनला क्रिकेट सुपरस्टार, वनडे पदार्पणातच घडवला इतिहास, दिग्गजांच्या यादीत नाव!

| Updated on: May 28, 2021 | 11:10 AM

उजव्या हाताचा विकेटकीपर फलंदाज के एल राहुल भारतीय बॅटिंगचं भविष्य मानलं जातं. भलेही त्याचं क्रिकेट करिअर संघर्षपूर्ण राहिलं असेल परंतु भविष्यात त्याच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. (KL Rahul B Com Degree jain University Cricket Career and record)

B.Com करता करता बनला क्रिकेट सुपरस्टार, वनडे पदार्पणातच घडवला इतिहास, दिग्गजांच्या यादीत नाव!
के एल राहुल
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. वर्षानुवर्ष या यादीत दिग्गजांची भर पडतीय. परंतु पाठीमागच्या काही वर्षापासून एक नाव असं आहे जे सतत संघामध्ये आत-बाहेर होतं आहे परंतु त्याच्यात टॅलेंटची अजिबातच कमी नाहीय. त्या खेळाडूचे नाव आहे के एल राहुल (KL Rahul)… उजव्या हाताचा विकेटकीपर फलंदाज के एल राहुल भारतीय बॅटिंगचं भविष्य मानलं जातं. भलेही त्याचं क्रिकेट करिअर संघर्षपूर्ण राहिलं असेल परंतु भविष्यात त्याच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. (KL Rahul B Com Degree jain University Cricket Career and record)

के. एल. राहुलचा जन्म 18 एप्रिल 1992 साली कर्नाटकातल्या बंगळुरु येथे झाला. राहुलच्या परिवारात शिक्षणाचं खूप मोठं महत्त्व आहे. के एल राहुलचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये प्रोफेसर आहेत आणि त्याची आई राजेश्वरी मँगलोर युनिव्हर्सिटीत प्रोफेसर आहे. सहाजिकच राहुलचा देखील त्याच्या शिक्षणावर पहिला फोकस राहिलेला आहे. राहुलचं बालपण मँगवोर येथं गेलं. त्यामुळे त्याचं संपूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मँगलोरमध्येच झालं. क्रिकेट खेळायला देखील त्याने मँगलोरमधूनच सुरुवात केलं. त्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केली तेव्हा तो बंगलोरमध्ये आला. तिथे त्यानं जैन युनिव्हर्सिटीमधून बीकॉम डिग्री घेतली. त्याच वेळेस त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली.

मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पदार्पण

के. एल. राहुलने कर्नाटक साठी 2010 आणि 2011 च्या मोसमात रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या सुंदर बॅटिंगचा जोरावर त्याने चार वर्षांच्या आतमधेच टीम इंडियामध्ये प्रवेश मिळवला. राहुलला 2014 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी देण्यात आली. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्याचं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. राहुलने मेलबोर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. परंतु पदार्पणाच्या मॅचमध्ये त्याला अपयश आलं. पहिल्या डावांत केवळ 3 आणि दुसऱ्या डावांत केवळ एक धाव काढून तो बाद झाला. परंतु असं असूनही भारतीय कर्णधाराने त्याला संधी दिली आणि त्या संधीचं त्यांने सोनं केलं.

एकदिवसीय पदार्पणात इतिहास

पुढच्याच कसोटी सामन्यात राहुलच्या बॅटमधून एक खणखणीत शतक आलं. राहुलच्या बॅटमधून पहिली तीन शतकं परदेशी खेळपट्टीवर आली. त्यांने सिडनी, कोलंबो आणि किंग्स्टन या मैदानांवर दमदार शतक झळकावली. 2016 मध्ये राहुलने एक मोठा इतिहास रचला.झिम्बाब्वे दौर्‍यावर त्याची निवड झाली आणि हरारे मध्ये त्यांना आपलं वन डे पदार्पणात दणदणीत शतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा भारताकडून तो एकमेव फलंदाज आहे.

दिग्गजांच्या यादीव नाव

राहुलच्या नावावर आणखी एक खास रेकॉर्ड आहे. या रेकॉर्डची तुलना जगातील बड्या फलंदाजांशी केली जाते. सलग 7 कसोटी सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा राहुल काही मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकाविरूद्धच्या मालिकेत राहुलने ही कामगिरी केली होती. राहुलशिवाय विंडीजचा दिग्गज फलंदाज एव्हर्टन वीक्स, श्रीलंकेचा अनुभवी श्रीलंका कुमार संगकारा आणि झिम्बाब्वेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज अ‍ॅन्डी फ्लॉवर यांनीही अशी कामगिरी केली आहे.

(KL Rahul B Com Degree jain University Cricket Career and record)

हे ही वाचा :

क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….

Sagar Dhankhar Murder: जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता, सुशील कुमार दंडुक्याने मारत होता, मर्डरदिवशीचा Video व्हायरल

मास्क घातला नाही म्हणून मिताली राजने मिश्किल अंदाज केलं वडिलांना ट्रोल, ट्विट व्हायरल