टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात आज सराव सामना सुरु आहे. सुर्यकुमार यादव (Surykumar Yadhav) आणि केएल राहूल (KL Rahul) या दोघांनी अर्धशतक पुर्ण केलं आहे. त्यामळे टीम इंडियाची धावसंख्या 186 झाली आहे. आजच्या सामन्यात केएल राहूल आणि सुर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली. आजच्या सामन्यात विराट कोहलीला अधिक धावा करता आल्या नाहीत. विराटने मारलेल्या षटकाराची सगळीकडे मात्र चर्चा आहे.
आजच्या मॅचमध्ये विराट कोहलीने फक्त 19 धावा काढल्या. परंतु एश्टन एगरच्या गोलंदाजीवरती षटकार खेचल्यानंतर एगर चेंडूकडे पाहत राहिला. विशेष म्हणजे विराट हा षटकार पुढे येऊन खेचला होता.
विराटच्या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच त्याची चर्चा सुद्धा अधिक होत आहे आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा सुध्दा 15 धावांवर बाद झाला.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलियन टीम
अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा .