पुणे : इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात भारताला (india Vs england 2nd ODI) पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना 337 धावांच्या भक्कम लक्ष्याचा बचाव करता आला नाही. प्रत्युत्तरात इंग्लंडने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना रन्सची खिरापत वाटली. फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep yadav) आणि क्रुणाल पांड्याला (Krunal Pandya) तर इंग्लिश फलंदाजांनी धू धू धुतलं. कुलदीपच्या 10 ओव्हर्समध्ये 84 रन्स तर क्रुणालच्या 6 ओव्हर्समध्ये 72 रन्स इंग्लिश फलंदाजांनी लुटले. (Krunal pandya Cant Bowling 10 Overs Says Suil Gavaskar)
या मॅचमध्ये भारताला सहाव्या गोलंदाजाची कमी जाणवली. संघात हार्दिक पांड्याचा पर्याय होता, परंतु विराट कोहलीने त्याचा उपयोग केला नाही. क्रुणालच्या फलंदाजीवर अनेकांनी स्तुतीसुमने उधळली पण त्याच्या खराब बोलिंगने त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स झाकला गेला. या सगळ्यावर भारताचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.
संघात पाचवा बोलर्स कधीच पर्याय म्हणून खेळू शकत नाही. भारतीय संघाची बोलिंग कमजोर दिसली कारण क्रुणाल पांड्या भारतीय संघाचा पाचवा बोलर होऊ शकत नाही. तो 10 ओव्हर्स फेकू शकेल, अशा बोलर नाहीय. अशा पीचवर संघाला युजेवेंद्र चहलसारखा बोलर हवा जो 10 ओव्हर्स फेकू शकेल. पांड्या ब्रदर्स 10 ओव्हर्स फेकू शकतात परंतु भारतीय संघाला जर मालिकेतला अंतिम सामना जिंकायचा असेल तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बोलर्सचा विचार संघाला करावाच लागेल, असं गावस्कर यांनी स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या बोलर्सची खराब बोलिंग भारताच्या पराभवाला जबाबदार ठरली. भारतीय बॅट्समननी धावांचा डोंगर उभा करुन दिलेला असतानाही बोलर्सचा विशाल धावाही वाचवता आल्या नाही. फिरकीपटू कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने तर अक्षरश: धावांची खिरापत वाटली. क्रुणालने 6 ओव्हरमध्ये तब्बल 72 रन्स दिले. 12 हा त्याचा इकोनॉमी रेट होता. 72 धावांच्या बदल्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
दुसरीकडे कुलदीपनेही तोच कित्ता गिरवला. कुलदीपने 10 ओव्हर्समध्ये 84 रन्स दिले. त्यालाही 84 धावांच्या मोबदल्यात एकही विकेट्स मिळवता आली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी कुलदीपला जोरदार लक्ष्य केलं. त्याच्या बोलिंगवर एकूण आठ षटकार इंग्लिश फलंदाजांनी लगावले. हे एकदिवसीय सामन्यातील कोणत्याही भारतीय गोलंदाजाला मारलेले सर्वांत जास्त षटकार आहेत.
(Krunal pandya Cant Bowling 10 Overs Says Suil Gavaskar)
हे ही वाचा :
Ind vs Eng : तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंना डच्चू?, मालिका विजयासाठी विराट सेनेची नवी रणनीती!
Ind vs Eng : के.एल राहुल ‘शेर’ तर स्टोक्स-बेअरस्टो ‘सव्वाशेर’, टीम इंडियाच्या पराभवाचे दोन व्हिलन