मुंबई : माजी भारतीय क्रिकेटर जेकब मार्टीन हे सध्या रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत आहेत. 28 डिसेंबर 2018 रोजी त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात जेकब हे गंभीर जखमी झाले, यात त्यांच्या फुफ्फस आणि लिव्हरला दुखापत झाली. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. उपचारासाठी खूप खर्च येत असल्याने जेकबच्या पत्नी ख्याती यांनी बीसीसीआयकडे जेकबच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी केली होती. यानंतर बीबीसीआयने त्यांना पाच लाख रुपयांची मदत केली. तर बडोदा क्रिकेट असोसिएशनने तीन लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. यातच क्रिकेटर कृणाल पंड्यानेही जेकब मार्टीनसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कृणालने मार्टीन यांच्या मदतीसाठी एक ब्लँक चेक दिला आहे.
एक लाखाहून कमी रक्कम भरु नये
टेलीग्रामच्या वृत्तानुसार, कृणालने मार्टीन यांच्या उपचारासाठी ब्लँक चेक देताना एक अट ठेवली. त्याने सांगितले की, “सर तुम्हाला जेवढ्याही पैशाची गरज असेल तेवढे यात भरा, पण एक लाखाहून कमी नाही”. मार्टीन हे बडोदाचे आहेत आणि कृणालही मुळचा बडोदाचा आहे. कृणालने याच सीझनमध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले आहे.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीनेही मार्टीन यांच्या उपचारासाटी आर्थिक मदत केली आहे. बडोदा क्रिकेट संघाचे माजी सचिव संजय पटेल हे मार्टीन यांच्या मदतीला पुढे येणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यांनीच गांगुलीची ख्याती मार्टीनशी भेट करवून दिली. यावेळी गांगुलीने त्यांना ‘आणखी कुठलीही मदत हवी असल्यास मला सांगा’, असे सांगितले.
जेकब मार्टीन यांनी 1999 साली सौरव गांगुली कर्णधार असताना वनडेमध्ये पदार्पण केले होते. ते भारतासाठी 10 वनडे खेळले. तसेच ते 138 फर्स्ट क्लास सामनेही खेळले आहेत. यात त्यांनी 47 च्या एव्हरेजने 9192 धावा काढल्या आहेत. 17 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी भारतासाठी पोर्ट एलिजाबेथ येथे केनिया विरोधात आपला शेवटचा सामना खेळला होता.
“मार्टीन यांच्या कुटुंबाला मदत मागावी की, नाही हे कळत नव्हते, मात्र आता त्यांच्यासाठी इतके मदतीचे हात पुढे सरसावले आहेत की त्यांना काहीही मागायची गरज नाही. क्रिकेट विश्वाशी जोडलेल्या अनेकांनी त्यांची मदत केली. भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे, तर माजी क्रिकेटर जहीर खाननेही मदतीचा हात पुढे केला आहे”, अशी माहिती संजय पटेल यांनी दिली.
संबंधित बातम्या :
पंड्या-राहुल वादावर जेंटलमन द्रविडची प्रतिक्रिया
लाज, शरम आणि अपमान, हार्दिक पंड्या घराबाहेर येईना, फोन उचलेना
हार्दिक पंड्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच ही अभिनेत्री भडकली