कोलंबो : काही दिवसांपूर्वीच आयपीएलचा (IPL 2020) 13 वा मोसम संपला. यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना लंका प्रीमियर लीगचा (Lanka Premier League 2020) थरार अनुभवायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं हे पहिलंच पर्व आहे. उद्यापासून म्हणजेच 26 नोव्हेंबरपासून या लंका प्रीमिअर लीगला सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर असे एकूण 21 दिवस ही स्पर्धा खेळण्यात येणार आहे. Lanka Premier League 2020 will start on November 29 with the participation of four former Team India players
All set for the much awaited moment
Franchise cricket is finally in Sri Lanka! Just over 24 hours to go…?#එක්වජයගමූ #WinItTogether #ஒன்றாகவெல்வோம் #LPL2020 #LPLT20 #LPL #My11CircleLPL pic.twitter.com/2M2Avb60wJ
— Lanka Premier League (@LPLt20official) November 25, 2020
या स्पर्धेत ट्रॉफीसाठी एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत. जाफना स्टॅलियन्स, दाम्बुला हॉक्स, कॅंडी टस्कर्स, कोलंबो किंग्स आणि गाले ग्लेडिएटर्स असे एकूण 5 संघ खेळणार आहेत. कोलंबो, कॅंडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना 5 जिल्ह्यांच्या नावावरुन 5 संघांचे नाव ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कॅंडी टस्कर्स विरुद्ध कोलंबो किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. यामध्ये एकूण 23 साखळी सामने खेळले जाणार आहेत. साखळीनंतर 13 आणि 14 डिसेंबरला 2 सेमीफायनल सामने खेळण्यात येणार आहे. या सेमीफायनलमध्ये जिंकणारे संघ 16 डिसेंबरला अंतिम सामन्यात आमनेसामने भिडतील.
Team Captains Are Ready!
Are you? ??5️⃣ Teams
1️⃣ Trophy#එක්වජයගමූ #wintogether#LPL2020 #LPLT20 pic.twitter.com/kE9H0SnkjT— Galle Gladiators (@TeamGalle) November 25, 2020
हे सर्व सामने श्रीलंकेतील एकूण 4 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहेत. आर प्रेमदासा आंतराराष्ट्रीय स्टेडियम कोलंबो, रनगिरी दांबूला आंतराराष्ट्रीय स्टेडियम, पल्लेकेल आंतराराष्ट्रीय स्टेडियम आणि सूर्यावेवा महिंदा राजपक्षे क्रिकेट स्टेडियम या 4 मैदानात हे सामने खेळण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत टीम इंडियाचे माजी खेळाडूही खेळताना दिसणार आहेत. यामध्ये इरफान पठाण (Irfan Pathan), मुनाफ पटेल (Mumnaf Patel), मनप्रीत गोनी (Manpreet Goni) आणि सुदीप त्यागी (Sudeep Tyagi) यांचा समावेश आहे. सुदीप त्यागीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सुदीप दांबुला संघाकडून खेळणार आहे. तर मनप्रीत गोनी कोलंबोचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच इरफान आणि मुनाफ हे दोघे कॅन्डी टस्कर्सकडून खेळताना दिसणार आहेत.
मुनाफ पटेलने (Munaf Patel) 70 एकदिवसीय, 3 टी-20 आणि 13 कसोटी सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. मुनाफने एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी सामन्यात अनुक्रमे 86, 4 आणि 35 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मुनाफने आयपीएलच्या एकूण 63 मॅचेसमध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत.
इरफान पठाणने (Irfan Pathan) टीम इंडियाकडून 120 एकदिवसीय, 29 कसोटी आणि 24 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. इरफानने 120 एकदिवसीय सामन्यात 1 हजार 544 धावा केल्या आहेत. तसेच 173 विकेट्स घेतल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये 24 सामन्यात 172 धावांसह 28 विकेट्स मिळवल्या आहेत. तर कसोटीतील एकूण 29 मॅचेसमध्ये 1 हजार 105 धावांसह 100 बळी घेतल्या आहेत.
https://twitter.com/theLPLt20/status/1331608781428559875
सुदीपने (Sudeep Tyagi) 12 डिसेंबर 2009 मध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध टी 20 मध्ये पदार्पण केलं होतं. तसेच सुदीपला यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी एकदिवसीय सामन्यातही पदार्पणाची संधी देण्यात आली. सुदीपने श्रीलंकेविरुद्धच एकदिवसीय पदार्पण केलं होतं. सुदीपने 27 डिसेंबर 2009 मध्ये एकदिवसीय सामन्यात डेब्यु केलं होतं. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम (तेव्हाचं फिरोजशाह कोटला मैदान) खेळण्यात आला होता. सुदीपने एकूण 4 एकदिवसीय सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर त्याला टी 20 मध्ये विकेट घेण्यास यश आले नाही.
सुदीपने एकूण 41 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 109 विकेट्स घेतल्या आहेत. तर 23 लिस्ट ए सामन्यात 31 बळी मिळवल्या आहेत. तसेच 23 टी 20 सामन्यात 16 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
दरम्यान या स्पर्धेच्या सुरुवातीआधीच काही अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. या खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. यामध्ये लसिथ मलिंगा (Lasitgh Malinga), लियाम प्लंकेट (Liam plunkett), ख्रिस गेल (Chris Gayle) आणि सरफराज अहमदचा (Sarfaraj Ahmed)समावेश आहे.
https://twitter.com/theLPLt20/status/1330892213002362880
https://twitter.com/theLPLt20/status/1330888244473499654
https://twitter.com/theLPLt20/status/1330884881916829704
https://twitter.com/theLPLt20/status/1330883183483695105
UPDATE: @GalleGladiators Squad
5️⃣ Teams
1️⃣ Trophy#එක්වජයගමූ #wintogether#LPLT20 #LPL2020 pic.twitter.com/NYZahPkrHF— Galle Gladiators (@TeamGalle) November 23, 2020
संबंधित बातम्या :
LPL 2020 Chris Gayle | गोलंदाजांचा कर्दनकाळ युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलची लंका प्रीमियर लीगमधून माघार
LPL 2020 | टीम इंडियाचा ‘हा’ माजी अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरण्यास सज्ज, ‘या’ टी 20 लीगमध्ये खेळणार
Lanka Premier League 2020 will start on November 29 with the participation of four former Team India players