ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (India vs Australia) यांच्यात तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळण्यात येत आहे. या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy) चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळण्यात येणार आहे. या सामन्यावर सध्या कोरोनाचं सावट आहे. ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचा जोर वाढला आहे. यामुळे क्विसलॅंड सरकारने 8 जानेवारीपासून 3 दिवसांसाठी टाळेबंदी (Lockdown) जाहीर केली आहे. यामुळे हा सामना रद्द होणार की नियोजित वेळापत्रकानुसार तिथेच खेळवला जाणारा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. (lockdown in brisbane due to corona new strain uncertainty over the 4th test match between aus vs ind)
नियोजित वेळापत्रकानुसार चौथा कसोटी सामना 15-19 जानेवारी दरम्यान खेळण्यात येणार आहे. टीम इंडिया या चौथ्या सामन्यासाठी 12 जानेवारीला सिडनीहून ब्रिस्बेनला रवाना होणार आहे. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये खेळाडूंना आपल्या हॉटेलमध्येच रहावे लागणार आहे. म्हणजेच हॉटेलबाहेर पडण्यावर मनाई असणार आहे. त्यात कोरोनाचा जोर वाढल्यास टाळेबंदी वाढवण्याबाबतचे संकेतही स्थानिक सरकारने दिले आहेत.
ब्रिस्बेनमधील एका क्वारंटाईन हॉटेलमधील कर्मचाऱ्याला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा झाली. या पार्श्वभूमीवर सरकारने टाळेबंदीचा कठोर निर्णय घेतला. ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियातील तिसरं मोठं शहर आहे. येथील लोकसंख्या ही जवळपास 20 लाख इतकी आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. कोरोनाचा नवा प्रकार ही फार भयंकर बाब आहे. ग्रेटर ब्रिस्बेन हा भाग कोरोना हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचे नियम अत्यंत कठोर आहेत. आम्ही आयपीएलदरम्यान क्वारंटाईन होतो. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आल्यानंतरही नियमांनुसार क्वारंटाईन होतो. आम्ही वेळोवेळी स्थानिक सरकारला सहकार्य केलं आहे. आमचा क्ववारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. यानंतर आम्हाला सर्व सामन्यांप्रमाणे बाहेर पडण्याची मुभा मिळेल, अशी आशा होती. मात्र ब्रिस्बेनमध्ये आम्ही खोलीत बंद राहणार नाही. याऐवजी चौथा सामनाही सिडनीतच घेण्यात यावा, अशी भूमिका टीम इंडियाची आहे, याबाबतचे माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र टीम इंडिया आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलिया बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
अवघ्या काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे व्हिडिओ कॉनफरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेला उपस्थित होता. “बाहेर परिस्थिती सामन्य आहे. अशावेळी आपण स्वत: ला खोलीत कोंडून घेणं फार आव्हानात्मक असतं”, अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली. दरम्यान आता या चौथ्या कसोटी सामन्याच्या आयोजनाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
AUS vs IND | चौथ्या कसोटीवर धोक्याचं सावट, ब्रिस्बेनमध्ये खेळण्यास टीम इंडियाचा नकार?
(lockdown in brisbane due to corona new strain uncertainty over the 4th test match between aus vs ind)