मुंबई : टीम इंडियाचा (Team India) जलदगती गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याने मलेशियाई एअरलाइन्सवरती गंभीर आरोप केला. ज्यावेळी तो न्यूझिलंडवरुन (NZ) बांगलादेशसाठी निघाला, त्यावेळी त्याचं सामान हरवलं आहे. त्याचबरोबर बिझनेस क्लासमधून प्रवास करीत असताना त्याला जेवण सुद्धा विचारलं नसल्याचं त्याने म्हटलं आहे. ही माहिती दीपक चाहरने ट्विटच्या माध्यमातून सांगितली आहे.
काल चाहरने ही माहिती त्याच्या सोशल मीडियावरून चाहत्यांना सांगितली. बांगलादेशमधील एकदिवसीय मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. काल त्याने टीम इंडियासोबत नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला. उद्या टीम इंडियाची पहिली एकदिवसीय मॅच असून मागच्या चोवीस तासांपासून तो बॅगची वाट पाहत आहे.
मोहम्मद शमीला दुखापत झाली असून उद्याच्या गोलंदाजीकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. कारण टीम इंडियाची फलंदाजी मागच्या काही दिवसांपासून अधिक चांगली होत आहे.
न्यूझिलंड दौऱ्यात दीपक चाहर असल्यामुळे त्याला बांगलादेशमध्ये जाणार उशिर झाला आहे. त्याच्यासोबत काल शिखर धवन सुद्धा बांगलादेशला जाणार होता.
एकदिवसीय सामन्यासाठी बांगलादेश टीम
लिटन दास (कर्णधार), अनामूल हक बिजॉय, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहिदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, हसन महमूद, इबादत हुसेन, नसुम अहमद, महमुदुल्लाह, नजमुल हुसेन, शान्तो, नजमुल हुसेन. नुरुल हसन सोहन.
एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन
कसोटीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जडेजा