मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊने दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. हैदराबादला पाच गडी आणि 24 चेंडू राखून पराभूत केलं आहे. या विजयासह लखनऊच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे. तर हैदराबादनं आपली पराभवाची मालिका सुरुच ठेवली आहे. सलग दुसऱ्या पराभवाची नोंद करत गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेला संघ ठरला आहे.
लखनऊला दोन सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे.पहिल्या सामन्यात लखनऊने दिल्लीला 50 धावांनी पराभूत केलं होतं. तर चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 12 धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तर हैदाराबादचा संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला आहे. राजस्थाननं पहिल्या सामन्यात हैदाराबादचा 72 धावांनी धुव्वा उडवला होता.
मुंबई : आयपीएलच्या दहावा सामना सनराईजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. हा सामना लखनऊ सुपर जायंट्सने 7 गडी आणि चेंडू राखून जिंकला. हैदराबादने 20 षटकात 8 गडी गमवून 121 धावा केल्या होत्या. हे आव्हान लखनऊनं 16 षटकात पूर्ण केलं. यासह लखनऊनं स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद करत दोन गुण खिशात घातले आहेत. तर हैदराबादची पराभवाची मालिका सुरुच आहे. हैदराबादने या स्पर्धेतील सलग दुसरा सामना गमावला आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यात संघ कशी कामगिरी करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
हैदराबादनं विजयासाठी दिलेल्या 122 धावांचा पाठलाग लखनऊने करताना सावध खेळी केली. विकेट रोखण्यासोबत जलद धावा करण्यावर जोर दिला. कायल मेयर्स आणि केएल राहुल जोडीने चांगली सुरुवात केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 35 धावांची खेळी केली. त्यानंतर कायल मेयर्स 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर दीपक हुड्डा अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कृणाल पांड्या मैदानात उतरला आणि आक्रमक खेळी करत 23 चेंडूत 34 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. उमरान मलिकच्या गोलंदाजीवर अनमोलप्रीत सिंगने त्याचा झेल घेतला. त्यानंतर विजयाच्या उंबरठ्यावर असताना केएल राहुल चुकीचा फटका मारून बाद झाला. अदिल राशीदच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर आलेला रोमारियो शेफर्ड पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही
दीपक हुडा अवघ्या 7 धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारनं आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला.
कायल मेयर्स 14 चेंडूत 13 धावा करू बाद झाला. फझलक फारुखीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा धाडसी निर्णय असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली होती. सलामीला अनमोलप्रीत सिंग आणि मयंक अग्रवाल जोडी मैदानात उतरली. पण संघाच्या 21 धावा असताना मयंक अग्रवालच्या रुपाने पहिला धक्का बसला. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारत झेलबाद झाला. मार्कस स्टोइनिसने झेल पकडण्याची कोणतीही संधी सोडली नाही. दुसऱ्या गड्यासाठी अनमोलप्रीत सिंग आणि राहुल त्रिपाठीने सावध खेळी केली. पण कृणाल पांड्याने त्याला एलबीडब्ल्यू करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला एडन मार्करामही काही खास करू शकला नाही. कृणाल पांड्याने त्याचा त्रिफळा उडवत शून्यावर तंबूत पाठवलं. त्यानंतर आलेल हॅरी ब्रूक 4 चेंडूत 3 धावा करून रवि बिष्णोईच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. राहुल त्रिपाठीही काही खास करू शकला नाही. मैदानात तग धरून राहिला खरा पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. यश ठाकुरच्या गोलंदाजीवर अमित मिश्राने त्याचा झेल घेतला. त्याने 41 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. उमरान मलिकच्या रुपाने हैदराबादला आठवा धक्का बसला आहे. एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद झाला आहे.
हैदराबादनं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेत घोर निराशा केली. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. 20 षटकात 8 गडी गमवून 121 धावा करता आल्या आणि विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं.
उमरान मलिकच्या रुपाने हैदराबादला आठवा धक्का बसला आहे. एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद झाला आहे.
वॉशिंगटन सुंदरच्या रुपाने सहावा धक्का बसला. तो 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला आदिल रशिद 4 धावांवर परतला.
Match 10. WICKET! 17.2: Rahul Tripathi 34(41) ct Amit Mishra b Yash Thakur, Sunrisers Hyderabad 94/5 https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
रवि बिष्णोईच्या गोलंदाजीवर ब्रूक यष्टीचीत झाला. त्याने 4 चेंडूत 3 धावा केल्या. या विकेटनंतर संघावरील दडपण वाढलं आहे.
Match 10. WICKET! 7.6: Aiden Markram 0(1) b Krunal Pandya, Sunrisers Hyderabad 50/3 https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
Match 10. WICKET! 7.5: Anmolpreet Singh 31(26) lbw Krunal Pandya, Sunrisers Hyderabad 50/2 https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारल्याने मयंक अग्रवाल बाद झाला आहे. त्याने 7 चेंडूत 8 धावा केल्या.
Match 10. WICKET! 2.5: Mayank Agarwal 8(7) ct Marcus Stoinis b Krunal Pandya, Sunrisers Hyderabad 21/1 https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
A look at the Playing XI for #LSGvSRH
Live – https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023 pic.twitter.com/ANfF4nWARa
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
:केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई
Match 10. Lucknow Super Giants XI: K L Rahul (c), K Mayers, N Pooran (wk), D Hooda, M Stoinis, K Pandya, A Mishra, R Bishnoi, Y Thakur, J Unadkat, R Shepherd. https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, आदिल रशीद
Match 10. Sunrisers Hyderabad XI: M Agarwal, A Singh (wk), R Tripathi, H Brook, A Markram (c), W Sundar, A Samad, B Kumar, T Natarajan, U Malik, A Rashid. https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
Match 10. Sunrisers Hyderabad won the toss and elected to bat. https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
Coming ? next ⏳
Match ? of #TATAIPL 2023??@LucknowIPL ? @SunRisers
Who do you reckon will win this one❓ pic.twitter.com/YOOkpjaHZd
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह.
हैदराबादचा पूर्ण स्क्वॉड : अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलक फारूकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, अकील होसैन, हेनरिक क्लासेन, अनमोलप्रीत सिंह, आदिल रशीद, मयंक मार्कण्डेय, विवरांत शर्मा, मयंक डागर, समर्थ व्यास, सनवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव आणि नीतीश कुमार रेड्डी.