पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२३ चा आज अंतिम सामना होतोय. तुम्ही क्रिकेटमध्ये हिंदीत किंवा इंग्रजी कमेंन्ट्री ऐकली असेल, पण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जे समालोचन होत आहे. ते एका पहाडी आणि दमदार प्रत्येक शब्दात वजन असलेलं समालोचन आहे. कमेंन्ट्री हा शब्द नवीन पिढीत रुढ झाला असला, तरी ही शुद्ध मराठीत होणारी ही कमेन्ट्री समालोचन या शब्दाची पुन्हा पुन्हा आठवण करुन देत आहे. या कमेंन्ट्रीत शिस्त आहे. विनंती आहे, मानसन्मान आहे, बेशिस्ती दिसली तर आधीच शब्दांनी दिलेली एक जरब आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने क्रिकेटच्या कमेंन्ट्री पेक्षाही दमदार कमेंन्ट्री ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने समोर आली आहे.
हो ऐका…असा शब्द जेव्हा कानावर येतो, तेव्हा त्या शब्दात एवढा दमदार पण कानाच्या खोलवर जाणार आवाज असतो, की पुढचा शब्द ऐकण्यासाठी कान टवकारल्यासारखं वाटतं. कुस्ती स्पर्धेकांची नाव घेताना आवाजाचा चढऊतार, बक्षिस काय हे सांगताना बक्षिस किती मोठं आहे, हे देखील आवाजाच्या चढउताराने होणार कौतुक.
एक नाही, दोन नाही, तीन – तीन जणं जरी मैदानात कमेंन्ट्री करत असतील तरी कुणाचाही गोंधळ उडत नाहीय. हिंदीत एखादं वाक्य वापरलं तर ते देखील तेवढंच दमदार त्याचं लहेजात होत आहे. समालोचक जेव्हा सळसळत्या रक्ताचा या शब्दाचा वापर करतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं, आपणही मैदानात उतरावं.
कुस्ती स्पर्धेत वेळेला महत्त्व दिलं जात आहे. पाहुण्याचं स्वागतही सोबत वेळेवर कुस्ती सुरु होईल अशी देखील तंबी आहे. रक्ताला रगत म्हणाताना जी झिंग ढोक्यावर येते, ती या कमेंन्ट्रीतून, यातंही कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटल्यावर येणारी ती ताकद काही कमी नाही. तेव्हा ऐकत रहावी ऐकत रहावी अशी ही कमेंन्ट्री आहे.