कुस्तीचा कुंभमेळा पुण्यात रंगणार; पवार-ब्रीजभूषण यांच्यात अखेर दिलजमाई…

| Updated on: Dec 14, 2022 | 9:00 PM

राज्यातील कुस्तीचा कुंभमेळा असंही या स्पर्धेला संबोधलं जाते. ही स्पर्धा आता पुण्यात होणार असल्याने आणि पुण्याला यजमानपदाचा मान मिळाला असल्याने राज्यातील पैलवानांसह कुस्तीप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

कुस्तीचा कुंभमेळा पुण्यात रंगणार; पवार-ब्रीजभूषण यांच्यात अखेर दिलजमाई...
Follow us on

नवी दिल्लीः राज्यातील कुस्तीचा कुंभमेळा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्यातच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन अखेर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतील वाद आज दिल्लीत मिटला असल्याचेही स्पष्ट झाले. खासदार शरद पवार यांची भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग यांनी भेट घेतल्यानंतर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पुण्यात होणार असल्याने आता कुस्तीशौकीनांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ब्रिजभूषण सिंग यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या राजीनामा व नव्या कार्यकारिणी शरद पवार यांनी ब्रीजभूषण सिंग यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

पुण्यातच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यावर आता दोन्ही खासदारांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा पुण्यातच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुस्तीच्या स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा आहे. कुस्ती स्पर्धेतील सर्वोच्च किताबाची ही स्पर्धा असल्याने या स्पर्धेला मानाची स्पर्धा समजली जाते.

राज्यातील कुस्तीचा कुंभमेळा असंही या स्पर्धेला संबोधलं जाते. ही स्पर्धा आता पुण्यात होणार असल्याने आणि पुण्याला यजमानपदाचा मान मिळाला असल्याने राज्यातील पैलवानांसह कुस्तीप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

अखेर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतील वाद आज दिल्लीत मिटला असल्याने महाराष्ट्रासह कुस्तीशौकिनांसाठी ही आनंदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

खासदार शरद पवार यांची भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग यांनी भेट घेतल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा व नव्या कार्यकारिणी ब्रीजभूषण सिंग यांच्याकडे सूपूर्द करुन महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आता पुण्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.