मुंबई : आयपीएलच्या (IPL) पहिल्या मोसमाला 2008 मध्ये सुरुवात झाली. तेव्हा पासून ते आतापर्यंत आयपीएलचं आयोजन केलं जातंय. या स्पर्धेमुळे सर्वांना रोजगार उपलब्ध झाला. नवख्या आणि नव्या दमाच्या खेळाडूंना हक्काचा मंच प्राप्त झाला. तर अनुभवी खेळाडू मालामाल झाले. महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. यात आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. मात्र हा विक्रम जर हटके आहे. धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. (mahendra singh dhoni has highest earning players in ipl)
धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळून तब्बल 137 कोटी कमावले आहेत. म्हणजेच धोनीने वेतन स्वरुपात 137 कोटी कमावले आहेत. आयपीएलच्या आगामी मोसमात धोनी कमाई बाबत 150 कोटींचा टप्पाही पूर्ण करणार आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमात खेळणार, अशी प्रतिक्रिया धोनीने 13 व्या मोसमात म्हटलं होतं.
धोनीला आयपीएलच्या पहिल्या 3 मोसमात खेळण्यासाठी 18 कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच प्रत्येक वर्षाला 6 कोटी रुपये. यानंतर धोनीच्या वेतनात वाढ झाली. यानंतरच्या पुढील 3 पर्वांसाठी धोनीला दरवर्षी 8 कोटी 28 लाख इतकी रक्कम देण्यात आली. त्यानंतर धोनीला 2014 आणि 2015 वर्षासाठी प्रत्येकी 12 कोटी 50 लाख रुपये मिळाले. यासह धोनीने पुणे संघाकडून खेळताना 2 वर्षांमध्ये 25 कोटींची कमाई केली. आयपीएलचा आगामी 14 व्या मोसमाला अवघे काही महिने शिल्लक आहेत. या 14 व्या मोसमासाठी धोनीला 15 कोटी मिळणार आहेत.
धोनीने कमावलेली ही रक्कम म्हणजेच त्याला आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळण्यासाठी मिळालेला पगार. या व्यतिरिक्त धोनी आतापर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून काही कोटी कमावले आहेत.
दरम्यान आयपीएलचा 14 वा मोसम काही महिन्यांवर आहे. या वेळेस कोरोनामुळे मेगा ऑक्शन होणार नाही. मात्र लिलाव प्रक्रिया होणार आहे. ही लिलाव प्रक्रिया पुढील महिन्यात 11 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती आहे.
धोनी आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. धोनीने आतापर्यंत चेन्नईला आपल्या नेतृत्वात चेन्नईला एकूण 3 वेळा विजेतपद मिळवून दिलं आहे. तसेच धोनी आयपीएलमध्ये यशस्वी फलंदाज राहिला आहे.
संबंधित बातम्या :
IPL AUCTION 2021 | आयपीएलच्या आगामी मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया 11 फेब्रुवारीला होण्याची शक्यता
(mahendra singh dhoni has highest earning players in ipl)