मुंबई : आयपीएलचा 14 व्या हंगामाची सुरुवात व्हायला मोजकेच दिवस शिल्लक आहेत. यांदाची आयपीएलची ट्रॉफी खिशात घालण्यासाठी सर्वच टीमने कंबर कसली आहे. त्यासाठी मागील अनेक दिवसांपासून सर्व टीम कसून सराव करत आहेत. मागील हंगामात प्ले ऑफ पर्यंत पोहचू न शकणारी चेन्नई सुपर किंग्ज ही टीमसुद्धा दिवसरात्र मेहनत करत आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) यावेळी वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसतोय. सराव करताना धोनी मोठे-मोठे षटकार मारताना दिसतोय. एका हाताने षटकार मारतानाचा धोनीचा असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Mahendra Singh Dhoni hitting six with one hand video goes viral)
धोनीने एका हाताने षटकार मारल्यामुळे या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. हा व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्जच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. मात्र अजूनही त्याचे लाखोंनी चाहते आहेत. एका हाताने षटकार मारणाऱ्या धोनीचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन्सना जाम आवडला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकटेमधून सन्यास घेतलेला असला तरी तो आपीयएलमध्ये सीएसके या संघाकडून खेळणार आहे. त्याच्या संघाचा पहिला सामाना दिल्ली कॅपिटल्सविरोधात होणार आहे.
पाहा व्हिडीओ :
IPL 2021 चा 14 वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 9 एप्रिलला आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाईल. मात्र आयपीएलच्या 14 व्या हंगामावर कोरोनाचा सावट आले आहे. या कारणामुळे खेळाडूंच्या आरोग्याची काळजी म्हणून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्वांना कोरोना लस देण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केली जाणार आहे. याविषयी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
इतर बातम्या :
चिडक्या क्विंटन डी कॉकला आयसीसीने दाखवला इंगा, आता ‘असं’ काही करण्याअगोदर तो लक्षात ठेवेन…!
(Mahendra Singh Dhoni hitting six with one hand video goes viral)