विजयवाडा : कॅप्टन कूल अशी महेंद्रसिंग धोनी(Mahendra Singh Dhoni) याची ओळख आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भले निवृत्त झाला असेल, पण क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची लोकप्रियता आजही टॉप स्कोअरवर आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना, त्याच्याबद्दल जी क्रेझ होती, तीच आजही त्याच्या चाहत्यांमध्ये कायम आहे. वयाच्या 41 व्या वर्षी धोनीने 41 फुटाची उंची गाठली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने तब्बल 41 फुटांचा कट आऊट तयार करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश मधील धोनीच्या एका चाहत्याने त्याचे 41 फुटाचे कटआउट उभारले आहे. धोनी आपला 41 वाढदिवस साजरा करणार आहे. या निमित्ताने धोनीचे 41 फुटाचंच कटआउट उभारुन त्याच्या या चाहत्याने त्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7 जुलैला धोनीचा वाढदिवस आहे. धोनी सध्या पत्नी साक्षीसोबत इंग्लंडमध्ये आहे. 4 जुलैला त्यांचा लग्नाचा वाढदिवस झाला. यामुळे मॅरेज अॅनव्हर्सरी त्याने तिथेच साजरी केली. आता तो त्याचा 41 वाढदिवसही तिथेच साजरा करेल, अशी शक्यता आहे.
धोनीने त्याचा 41 वा वाढदिवस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात साजरा करू दे. मात्र त्याचे चाहते त्याचा वाढदिवस तितक्याच उत्साहात साजरा करताना दिसतात.
आंध्र प्रदेशच्या विजयवाडा जिल्ह्यात रहाणाऱ्या धोनीच्या चहात्याने त्याचा हा 41 फुटचा कटआउट उभारला आहे. हॅलिकॉप्टर शॉट धोनीची ओळख आहे. या कटआउटमध्ये धोनीची तीच मुद्रा आहे. सोशल मीडियावर धोनीचा हा कटआउट तुफान व्हायर होत आहे. चाहते त्याला अॅडव्हान्समध्येच वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये जे योगदान दिले, त्यामुळे तो क्रिकेट चाहत्यांमध्ये इतका लोकप्रिय आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये धोनीने भारताचे स्थान आणखी उंचावले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारत कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 झाला. आयसीसीच्या तिन्ही मोठ्या स्पर्धा जिंकल्या.