नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे (Man giving threat of rape to daughter of MS Dhoni arrested from Gujrat). आरोपी गुजरातमधील कच्छ येथे राहणारा आहे. पोलिसांनी कच्छमधूनच मुसक्या आवळल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सविरोधात पराभव झाल्यानंतर धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जवर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावर CSK च्या खेळाडूंची चेष्टा करण्यात आली. इतकंच नाही तर एकाने खालची पातळी गाठत सोशल मीडियावर थेट धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. आरोपीने धोनी आणि त्याची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बलात्काराची धमकी देणारे मेसेज केले होते.
यानंतर रांचीमधील रातू रोड येथील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सोशल मीडियावर ही धमकी देणाऱ्याचा शोध सुरु केला. अखेर तपासात तो गुजरातमध्ये असल्याचं उघड झालं. त्यानंतर त्याला गुजरातमधील कच्छ येथून अटक करण्यात आली.
7 ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना झाला होता. हा सामना CSK ने केवळ 10 धावांनी गमावला होता. सामन्यादरम्यान एकवेळ अशीही आली की आता CSK हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र अचानक सीएसकेची फलंदाजी ढेपाळली आणि सामना सीएसकेच्या हातातून गेला. अशाप्रकारे सीएसके एक जिंकत आलेला सामना हरली.
या सामन्यात धोनीने 12 चेंडूंमध्ये केवळ 11 धावा बनवल्या होत्या. दुसरीकडे केदार जाधवने 12 चेंडूत केवळ 7 धावा केल्या. त्याला या सामन्याचा खरा खलनायक ठरवण्यात आलं. या सामन्यात झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर सीएसकेच्या खेळाडूंचं वाईट पद्धतीने ट्रोलिंग झालं. धोनीसह त्याचं कुटुंबही याचाच बळी ठरलं. मात्र, पोलिसांनी केलेल्या या कठोर कारवाईमुळे आता तरी ट्रोलिंगला काही प्रमाणात आळा बसेल का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; ‘या’ खेळाडूंवर फोडलं खापर
IPL 2020, CSK vs RCB Live : विराटच्या बंगळुरुकडून धोनीच्या किंग्जसवर 37 धावांनी मात
Man giving threat of rape to daughter of MS Dhoni arrested from Gujrat