मुंबई : क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना खराब फॉर्ममुळे, फिटनेसमुळे अथवा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावं लागलं आहे. मात्र त्यातून सावरत अनेक खेळाडू संघात पुनरागमन करतात. असाच एक खेळाडू आता टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मनीष पांडे असं या खेळाडूचं नाव आहे. दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर जावं लागलेला मनीष पांडे आता संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडतोय. (Manish Pandey returning from injury, Scored unbeaten 34 runs from 20 balls In Vijay Hazare Trophy)
उजव्या हाताचा फलंदाज असलेला मनीष पांडे दुखापतीतून सावरल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या दिशेने त्याने प्रवास सुरु केला आहे. दुखापतीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत मनीष पांडेने छोटी परंतु स्फोटक खेळी करत टीम इंडियाचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पांडेची बॅट तळपल्याचे सर्वांना पाहायला मिळाले.
मनीष पांडेने केरळविरुद्धच्या बाद फेरीत 20 चेंडूत 34 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामातील मनीष पांडेचा हा पहिलाच सामना होता. वास्तविक, या सामन्याद्वारे तो दुखापतीतून परतला आहे. शेवटच्या षटकांत त्याने खेळलेल्या स्फोटक खेळीमुळे कर्नाटकने केरळसमोर 338 धावांचा डोंगर उभा केला.
भारताला इंग्लंडविरुद्ध भारतात एकदिवसीय मालिका खेळायची आहे, त्यासाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. मनीष पांडेने त्याच्या या छोट्या आणि स्फोटक खेळीद्वारे निवड समितीला त्याच्या फॉर्मबाबतचा संदेश दिला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मनीष पांडे न्यूझीलंड दौर्यावर शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
मनीष पांडेने 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात त्याने 35.1 च्या सरासरीने 492 धावा जमवल्या आहेत. त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर 39 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 44.3 च्या सरासरीने 3 अर्धशकांसह 709 धावा फटकावल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 146 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 18 अर्धशतकांसह 3268 धावा फटकावल्या आहेत.
ठरलं! जसप्रीत बुमराहच्या लग्नाचा बार उडणार; ‘या’ दिवशी गोव्यात संजना गणेशनसोबत बांधणार लगीनगाठ#JaspritBumrah #bumrahwedding #SanjanaGanesan #bumrah https://t.co/8rAGfRm0zR
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
इतर बातम्या
IPL 2021 | ‘या’ स्टार क्रिकेटपटूला तुम्ही ओळखलंत का?
(Manish Pandey returning from injury, Scored unbeaten 34 runs from 20 balls In Vijay Hazare Trophy)