धोनीच्या नेतृत्त्वात बोलिंगमध्ये झंझावात, मात्र आई आणि बायकोच्या भांडणात करिअर संपलं

| Updated on: Mar 17, 2021 | 1:15 PM

भारताचा असा एक खेळाडू ज्या खेळाडूने कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली झंझावाती बोलिंग केली. प्रतिस्पर्धी संघाच्या अनेक दिग्गजांना तंबूत पाठवलं.

धोनीच्या नेतृत्त्वात बोलिंगमध्ये झंझावात, मात्र आई आणि बायकोच्या भांडणात करिअर संपलं
मनप्ती गोनी
Follow us on

मुंबई : भारताचा असा एक खेळाडू ज्या खेळाडूने कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली झंझावाती बोलिंग केली. प्रतिस्पर्धी संघाच्या अनेक दिग्गजांना तंबूत पाठवलं. क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात आपलं मोठं नाव कमावलं. पण त्याचं एवढं दुर्दैव की आई आणि बायकोच्या भांडणात त्याचं करिअर संपलं… त्या खेळाडूचं नाव मनप्रीत गोनी (Manpreet Gony)…! (Manpreet Gony Under MS Dhoni Captainship rocking Bowling performance)

तगडा बोलर आणि फटकेबाजी करणारा बॅट्समन

मनप्रीत गोनीने धोनीच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये कमाल केली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर त्याला भारतीय संघाची दारं उघडी झाली. मात्र त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर जास्त काळ टिकलं नाही. एक तगडा बोलर आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये ताकदीने बॅटिंग करणारा बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे.

पंजाबच्या संघाकडून तो रणजी क्रिकेट खेळायचा. 2008 ची आयपीएल सुरु होण्याच्या काही दिवस अगोदर त्याने लिस्ट A चं करिअर सुरु केलं होतं. फर्स्ट क्लासमध्ये त्याने 2007 लाच पाऊल ठेवलं होतं. सुरुवातीच्या सामन्यातल्या चांगल्या खेळीमुळे त्याला आयपीएलमधल्या चेन्नई संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या मोसमात त्याला 16 मॅचेसमध्ये 17 विकेट्स मिळाल्या.

पत्नीसोबत घटस्फोट, आईसोबत भांडणं

मनप्रीत गोनीच्या कारकीर्दीवर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेचा खूप परिणाम झाला. पत्नीबरोबर घटस्फोटाच्या प्रकरणांमुळे तो अडचणीत आला. त्याच्या आईसोबतही त्याची भांडणं झाली. यामुळे मनप्रीत गोनीच्या क्रिकेट कारकीर्दीवर परिणाम होऊन त्याचा परफॉर्मन्स लूज झाला.

2017 मध्ये आयपीएलमध्ये कमबॅक पण…

मनप्रीत गोनी 2015 मध्ये अमेरिकेला गेला. तिथे गेल्यानंतर त्याने विविध लीग स्पर्धेत सहभाग घेतला. परंतु हा त्याचा सिलसिला फार काळ टिकला नाही. 216 मध्ये पुन्हा भारतात त्याने पंजाबकडून खेळणं सुरु केलं. जोरदार पद्धतीने त्याने पुनरागमन केलं. 2016-2017 साली त्याने रणजी मोसमात पंजाबकडून सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. याच परफॉर्मन्सच्या जोरावर तो पुन्हा आयपीएल 2017 च्या मोसमात खेळला. पण ज्यास्त सामने खेळण्याची त्याला संधी मिळाली नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास

मनप्रीत गोनीने 2019 मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर आता तो विविध टी ट्वेन्टी लीगमध्ये खेळताना दिसतो आहे. सध्या तो सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग युवराज सिंह यांच्यासोबत वर्ल्ड सिरीज रोड सेफ्टीमध्ये खेळत आहे.

(Manpreet Gony Under MS Dhoni Captainship rocking Bowling performance)

हे ही वाचा :

ICC कडून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ‘या’ 2 खेळाडूंवर 8 वर्षांची बंदी

India vs England T20I Series | टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, ‘यॉर्कर किंग’ पुनरागमनासाठी सज्ज