बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडियाने टी 20 वर्ल्डकप जिंकला आणि देशभरात जल्लोष झाला. भारतीय संघातील खेळाडूंचे काल मायदेशी आगमन झाले आणि त्यांच्या स्वागतसाठी लाखो मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवर गर्दी केली होती. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत तुफान गर्दी झाली होती. लाखोच्या संख्येने क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले होते. वानखेडे स्टेडियमवरही चाहत्यांनी विजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही वेगाने फिरत आहेत.
मात्र मरीन ड्राईव्हवरील रॅलीला, या आनंदाला गालबोट लागले. कारण तेथील तूफान गर्दीमुळे अनेकांना त्रास झाला, बऱ्याच जणांचा श्वास कोंडले, गुदमरू लागल्याने त्यांची तब्येतही बिघडली होती. अनेकांच्या हातापायाला दुखापत झाली. जखमींपैकी काहींना व्हीटी येथील जीटी रुग्णालयात नेण्यात आलं.
तो व्हिडीओ समोर
याच दरम्यान मरीन ड्राइव्ह येथील दुकानातील एक व्हिडीओ समोर आला आहे. तेथील गर्दीमुळे काहींना गुदमरल्यासारखे वाटू लागले, तर काही जण बेशुद्धही झाले. त्यांना गर्दीतून बाहेर काढून उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये प्रचंड गर्दीमुळे एक तरूणी बेशुद्ध झाली होती. तेथील एका पोलिस कर्मचाऱ्याने त्या गर्दीतून तिला कसंबसं बाहेर काढलं, तिला सरळ खांद्यावर टाकलं आणि गर्दीतून वाट काढत तो तिला उपचारांसाठी घेऊन गेला. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Disturbing visuals from #victoryprade at Mumbai’s Marine drive
All govts are proved poor crowd management
Even we should salute Mumbai police 🚨 men women took efforts pic.twitter.com/oq8VGfywtf
— Dr. Namdeo Bhagile Patil (@BbNamdeo) July 5, 2024
टीम इंडियाच्या विजयी रॅलीत धक्काबुक्की, अनेकांचा श्वास गुदमरला… pic.twitter.com/S7t77srL5Y
— jitendra (@jitendrazavar) July 5, 2024
टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत टीम इंडियाची विजय रॅली निघाली. भारतीय संघातील खेळाडूंसाठी एक खास बस तयार करण्यात आली आहे. या विजयी रॅलीस पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. या गर्दीवर नियंत्रण करणे पोलिसांना अवघड झाले. यामुळे लाठीमार करावा लागला. अनेक चाहते स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.