वेलिंग्टन : न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर 5 व्या टी 20 सामन्यात (NZ vs AUS T 20) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने ही टी 20 मालिका 3-2 च्या फरकाने जिंकली. जो खेळाडू आयपीएलच्या 14 व्या मोसमात अनसोल्ड राहिला, त्या खेळाडूने न्यूझीलंडला 27 चेंडूआधी विजय मिळवून दिला. या फलंदाजाचं नाव (Martin Guptill) मार्टिन गुप्टील. गुप्टील जेव्हा मैदानात आला तेव्हा त्याने कांगारुंच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने गगनचुंबी षटकार खेचले. गुप्टीने विजयी खेळी साकारली. गुप्टीने 46 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 71 धावांची खेळी केली. म्हणजेच गुप्टीलने चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच 52 धावा चोपल्या. या विजयासह मालिकाही खिशात घातली. (Martin Guptill 71 runs New Zealand win the t 20 series against Australia)
Guptill shows his power! 25/0 after 3 in pursuit of 143 LIVE on @sparknzsport ? #NZvAUS pic.twitter.com/PhwvCSeDS6
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 7, 2021
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगसाठी मैदानात आली. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 142 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर कर्णधार फिंचनेही 36 रन्सची खेळी केली. न्यूझीलंडकडून इश सोढीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि टीम साउथीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 143 धावांची आवश्यकता होती.
हा पाचवा सामना मालिकेच्या दृष्टीने महत्वाचा होता. याआधीच्या 4 सामन्यांपैकी उभयसंघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले होते. त्यामुळे मालिका विजयाच्या दृष्टीने ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची होती.
विजयी आव्हानाचे पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडकडून डेवोन कॉनवे आणि मार्टिन गुप्टील सलामी जोडी मैदानात आली. न्यूझीलंडने झोकात सुरुवात केली. या दोघांनी 106 धावांची सलामी शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान या दोघांनी कांगारुंना चोप चोपला. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी चौकार षटकारांची आतिषबाजी केली. गुप्टीने पार्टनरशीपमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र 106 धावांवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. डेवोन 36 धावा करुन माघारी परतला. यानंतर कर्णधार केन विल्यमन्सन तिसऱ्या क्रमांकावर आला. तो आला तसाच परत गेला. तो पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडता माघारी परतला. त्यामुळे न्यूझीलंडची 106-0 वरुन 106-2 अशी स्थिती झाली.
? run partnership for Guptill x Conway ? #NZvAUS pic.twitter.com/LSbcukoSKj
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 7, 2021
पण यानंतरही मार्टिनने एक बाजू लावून धरली होती. तो फटकेबाजी करत होता. मार्टिनने चौकार खेचले. पण त्यानंतर मार्टिनही न्यूझीलंडची धावसंख्या 124 असताना 71 धावांवर बाद झाला. पण मार्टिनने आपली भूमिका चोख पार पाडली होती. त्याने न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. त्यानंतर ग्लेन फीलीप्सने संघांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 16 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 34 धावांची तडाखेदार नाबाद खेळी केली. यासह न्यूझीलंडने 7 विकेट्सने विजय साकारला.
What a knock! @Martyguptill departs for 71 (46) to a magnificent @skystadium ovation? #NZvAUS pic.twitter.com/qPa3K7OBqT
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 7, 2021
गुप्टील त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र त्यानंतर तो आयपीएलच्या 14 व्या मोसमातील लिलावात अनसोल्ड राहिला. म्हणजेच त्याला कोणत्याही फ्रँचायजीने खरेदी केलं नाही. त्याच्यावर सर्वच फ्रँचायजींनी अविश्वास दाखवला. पण मार्टिनने नाबाद अर्धशतकी खेळी करत त्यांना चोख उत्तर दिलं आहे.
संबंधित बातम्या :
(Martin Guptill 71 runs New Zealand win the t 20 series against Australia)