पाकिस्तान टीम (Pakistan Team) सध्या ऑस्ट्रेलियात विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेचे सराव सामने खेळत आहेत. त्याचबरोबर तिथं अधिक सराव करीत आहे. टीम इंडियाची (Team India) आणि पाकिस्तानची रविवारी मॅच होणार आहे. जगभरातल्या क्रिकेटच्या चाहत्यांना मॅचची उत्सुकता लागली आहे. मेलबर्नमधील मैदानात ही मॅच होणार आहे. तिथं पाऊस पडण्याची अधिक शक्यता असल्याचे ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
काल पाकिस्तानची टीम सराव करीत असताना मॅथ्यू हेडनने पाकिस्तानचा तेज गोलंदाज मोहम्मद वसीम यांच्यासोबत एक पैज लावली. ती पैज मोहम्मद वसीम याने स्विकारली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
मॅथ्यू हेडनने मोहम्मद वसीम बॉल स्टेडियमच्या बाहेर फेकला तर 100 डॉलर देतो अशी एक पैज लावली होती. ज्यावेळी वसीमने चेंडू हातात घेतला, त्यावेळी त्याने अंदाज घेतला. तसेच त्याने तो पळत जाऊन फेकला सुध्दा, पण चेंडू बाहेर गेला नाही.
चेंडू मोहम्मद वसीमने बाहेर फेकला नाही, त्यानंतर तिथं उपस्थित असलेले सगळे खेळाडू या गोष्टीवर हसत होते.