कॅनबेरा : टीम इंडियाने पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय (India vs Australia 2020) मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून केएल राहुल (K L Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan)सलामीला आले. केएलने सलामीला न येता पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी यावे. तसेच शिखरसोबत सलामीला केएलऐवजी मयंक अगरवालने यावे, असा सल्ला टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी दिला आहे. mayank agarwal open the innings and k l rahul should bat at number five, said sanjay bangar
“टी 20 मालिकेत सलामीला केएलऐवजी मयंक हा सर्वोत्तम पर्याय आहे. रोहित शर्माला दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत सलामीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला. टीम इंडियाने सलामीसाठी धवनसह मयंकलाच पाठवायला हवे”, असं वक्तव्य संजय बांगर यांनी केलं. बांगर स्टार स्पोर्ट्ससोबत बोलत होते.
मयंकने शिखरसोबत ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात सलामी केली. या दोन्ही सामन्यात मयंकला अपेक्षित आणि चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. यामुळेच मयंकला तिसऱ्या एकदिवसीय आणि पहिल्या टी 20 सामन्यात संधी मिळाली नाही.
“राहुलने 5 व्या क्रमांकावर बॅटिंग करताना टीम इंडियासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. राहुलने पाचव्या क्रमांकावरच फलंदाजसाठी यायला हवं”, असंही बांगर यांनी नमूद केलं.
केएलने ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र त्याला या क्रमांकावर फार उठावदार फलंदाजी करता आली नाही. तर या विरोधात पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक लगावलं. केएलने आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) सलामीला येत दमदार कामगिरी केली होती. सलामीला धमाकेदार फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावली होती. आयपीएल स्पर्धेत एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते.
3 टी 20 सामन्यातील दुसरा सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा दुसरा सामना ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ चा असणार आहे. तर टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.
संबंधित बातम्या :
India vs Australia 2020 | टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेला मुकणार
mayank agarwal open the innings and k l rahul should bat at number five, said sanjay bangar