MI vs CSK IPL 2023 Highlight : चेन्नई सुपर किंग्सनं मुंबईला पाजलं पराभवाचं पाणी, 7 गडी राखून मिळवला विजय

| Updated on: Apr 08, 2023 | 10:59 PM

MI vs CSK IPL 2023 Highlight | आयपीएल 2023 स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने दुसरा विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सला अद्याप विजयाचा सूर गवसलेला नाही.

MI vs CSK IPL 2023 Highlight : चेन्नई सुपर किंग्सनं मुंबईला पाजलं पराभवाचं पाणी, 7 गडी राखून मिळवला विजय
Follow us on

मुंबई –  आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सनं सलग दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईचा एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. चेन्नईला विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान चेन्नईने 7 गडी आणि 11 चेंडू राखून पूर्ण केलं. मुंबईला या स्पर्धेत आणखी 12 सामने खेळायचे आहेत. तत्पूर्वी फलंदाजांचा फॉर्म पुन्हा गवसणं गरजेचं आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 08 Apr 2023 10:36 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नईला तिसरा धक्का, शिवम दुबे बाद

  • 08 Apr 2023 10:01 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | अर्जुन तेंडुलकरची संधी पुन्हा हुकली, कार्तिकेय इम्पॅक्ट प्लेयर

    डावखुरा चायनामन कुमार कार्तिकेयला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी

  • 08 Apr 2023 09:56 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | अजिंक्य रहाणेचं जलद अर्धशतक

  • 08 Apr 2023 09:52 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी, अर्शद खानची गोलंदाजी फोडली

  • 08 Apr 2023 09:31 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नईला कॉनवेच्या रुपाने पहिला धक्का, खातं न खोलता झाला बाद

  • 08 Apr 2023 09:15 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सचं वानखेडेच्या मैदानावर चेन्नईला सोपं आव्हान

    मुंबई –  आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं 8 गडी गमवून 157 धावा केल्या. चेन्नईला विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे. वानखेडेच्या मैदानावर ही धावसंख्या सहज गाठणं सोपं आहे. त्यामुळे आता मुंबईच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. दुसरीकडे अर्जुन तेंडुलकराला संधी दिली जाते का नाही ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी सलामीला आली. पहिल्याच षटकात दोन चौकार मारत रोहित शर्माने आपला आक्रमक अंदाज दाखवला. रोहित शर्माचं वादळ घोंगावण्यापूर्वी तुषार देशपांडेनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 13 चेंडूत 21 धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. पण इशान किशनला रवींद्र जडेजाने रोखलं आणि ड्वेन प्रेटोरियसनं इशान किशान त्याचा झेल घेतला. त्याने 21 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

    सूर्यकुमार यादव मैदानात आला पण हजेरी लावून पुन्हा निघून गेला. त्याला या सामन्यातही सूर गवसला नाही. 2 चेंडूत अवघी 1 धाव करून बाद झाला. पंचांनी त्याला नाबाद दिलं होतं. पण मैदानात धोनी असेल तर डीआरएसचं काय सांगता येत नाही. पंचांचा निर्णयानंतर लगेचच धोनीने रिव्ह्यू घेतला. मग काय पंचांचा निर्णय चुकीचा ठरला आणि सूर्यकुमार यादव बाद झाला. डीआरएस म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टम याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

    सूर्यकुमार यादव तंबूत पोहोचत नाही तोच कॅमरून ग्रीन बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेलं घेतला. चेंडू इतक्या वेगाने होता की पंचही मैदानावर झोपलं. पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोच झेल जडेजाच्या हातात होता. अर्शद खानही चांगली कामगिरी करू शकला नाही. मिशेल सॅटनरच्या गोलंदाजीवर अर्शद खान एलबीडब्ल्यू झाला.

    तिलक वर्माही काही खास करू शकला नाही. त्याच्या रुपाने सहावा गडी बाद झाला आणि डीआरएसही वाया गेला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 18 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्या.

    ट्रिस्टन स्टब्सकडून मुंबईला खूपच अपेक्षा होत्या. पण उंच फटका मारल्यानंतर त्याचा अप्रतिम झेलं सीमारेषेवर घेण्यात आला. ड्वेन प्रेटोरियसनं अप्रतिमरित्या चेंडू अडवला आणि सीमारेषेबाहेर जाण्यापूर्वी आत फेकला. मग काय संधीचं सोनं करत ऋतुराज गायकवाडनं त्याचा झेल घेतला.

    स्टब्स 10 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर टीम डेविडने चांगली फटकेबाजी केली. त्याने 22 चेंडूत 31 धावा केल्या. तुषार देशपांडेने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. सीमारेषेवर अजिंक्य रहाणेने त्याचा झेल घेतला.

  • 08 Apr 2023 08:59 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | टीम डेविड 31 धावा करून बाद

  • 08 Apr 2023 08:52 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सला सातवा धक्का, स्टब्स झेल बाद

  • 08 Apr 2023 08:38 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सला सहावा धक्का, तिलक वर्मा बाद झाल्याने दडपण वाढलं

    तिलक वर्माही काही खास करू शकला नाही. त्याच्या रुपाने सहावा गडी बाद झाला आणि डीआरएसही वाया गेला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 18 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्या.

  • 08 Apr 2023 08:11 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | सूर्यकुमार यादव पुन्हा फेल, अवघी एक धाव करून बाद

    सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाला. पंचांनी नॉट आऊट दिल्याने महेंद्रसिंह धोनीने रिव्ह्यू घेतला. अखेर पंचांचा निर्णय चुकीचा ठरला आणि धोनीचा रिव्ह्यू खरा ठरला.

  • 08 Apr 2023 08:05 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | इशान किशन 32 धावा करून बाद

    आक्रमक खेळी करणाऱ्या इशान किशनला रवींद्र जडेजाने बाद केलं. त्याने 21 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

  • 08 Apr 2023 08:02 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | पावरप्लेच्या 6 षटकात 1 बाद 61 धावा, इशानची आक्रमक खेळी

    मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सनं आक्रमक सुरुवात केली. पहिल्या 6 षटकात एक गडी गमवून 61 धावा केल्या.

  • 08 Apr 2023 07:59 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | इशान किशनची आक्रमक खेळी, ठोकले सलग दोन चौकार

    रोहित शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशननं आक्रमक खेळी सुरुच ठेवली आहे.

  • 08 Apr 2023 07:52 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | रोहित शर्मा बोल्ड, तुषार देशपांडेने दाखवला तंबूचा रस्ता

    रोहित शर्मा 13 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.

  • 08 Apr 2023 07:32 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सचं वानखेडेच्या मैदानावर चेन्नईला सोपं आव्हान

    मुंबईचा डाव

    मुंबई –  आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं 8 गडी गमवून 157 धावा केल्या. चेन्नईला विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे. वानखेडेच्या मैदानावर ही धावसंख्या सहज गाठणं सोपं आहे. त्यामुळे आता मुंबईच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. दुसरीकडे अर्जुन तेंडुलकराला संधी दिली जाते का नाही ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी सलामीला आली. पहिल्याच षटकात दोन चौकार मारत रोहित शर्माने आपला आक्रमक अंदाज दाखवला. रोहित शर्माचं वादळ घोंगावण्यापूर्वी तुषार देशपांडेनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 13 चेंडूत 21 धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. पण इशान किशनला रवींद्र जडेजाने रोखलं आणि ड्वेन प्रेटोरियसनं इशान किशान त्याचा झेल घेतला. त्याने 21 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

    सूर्यकुमार यादव मैदानात आला पण हजेरी लावून पुन्हा निघून गेला. त्याला या सामन्यातही सूर गवसला नाही. 2 चेंडूत अवघी 1 धाव करून बाद झाला. पंचांनी त्याला नाबाद दिलं होतं. पण मैदानात धोनी असेल तर डीआरएसचं काय सांगता येत नाही. पंचांचा निर्णयानंतर लगेचच धोनीने रिव्ह्यू घेतला. मग काय पंचांचा निर्णय चुकीचा ठरला आणि सूर्यकुमार यादव बाद झाला. डीआरएस म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टम याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

    सूर्यकुमार यादव तंबूत पोहोचत नाही तोच कॅमरून ग्रीन बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेलं घेतला. चेंडू इतक्या वेगाने होता की पंचही मैदानावर झोपलं. पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोच झेल जडेजाच्या हातात होता. अर्शद खानही चांगली कामगिरी करू शकला नाही. मिशेल सॅटनरच्या गोलंदाजीवर अर्शद खान एलबीडब्ल्यू झाला.

    तिलक वर्माही काही खास करू शकला नाही. त्याच्या रुपाने सहावा गडी बाद झाला आणि डीआरएसही वाया गेला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 18 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्या.

    ट्रिस्टन स्टब्सकडून मुंबईला खूपच अपेक्षा होत्या. पण उंच फटका मारल्यानंतर त्याचा अप्रतिम झेलं सीमारेषेवर घेण्यात आला. ड्वेन प्रेटोरियसनं अप्रतिमरित्या चेंडू अडवला आणि सीमारेषेबाहेर जाण्यापूर्वी आत फेकला. मग काय संधीचं सोनं करत ऋतुराज गायकवाडनं त्याचा झेल घेतला.

    स्टब्स 10 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर टीम डेविडने चांगली फटकेबाजी केली. त्याने 22 चेंडूत 31 धावा केल्या. तुषार देशपांडेने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. सीमारेषेवर अजिंक्य रहाणेने त्याचा झेल घेतला.

  • 08 Apr 2023 07:29 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला

    मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी सलामीला आली.

  • 08 Apr 2023 07:15 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन

    चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.

  • 08 Apr 2023 07:12 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

  • 08 Apr 2023 07:11 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | अर्जुन तेंडुलकरला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी

    जोफ्रा आर्चरला दुखावत झाल्याने अर्जुन तेंडुलकरचं नाव इम्पॅक्ट प्लेयरमध्ये घेण्यात आलं आहे. त्यामुळे अर्जुन गोलंदाजी करताना दिसू शकतो.

  • 08 Apr 2023 07:02 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने, धोनीने घेतला गोलंदाजीचा निर्णय

    मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा अंदाज घेऊन महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 08 Apr 2023 06:25 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | दोन्ही संघाचे आकडे काय सांगतात?

    आयपीएलमध्ये एका मोसमामध्ये प्रत्येक संघ एका टीमविरुद्ध एकूण 2 वेळा भिडतं. मात्र मुंबई आणि चेन्नई यांचं नातं या पलीकडचं आहे. साखळी फेरी व्यतिरिक्त मुंबई-चेन्नई अनेकदा फायनलमध्येही भिडले आहेत. आतापर्यंत उभयसंघांमध्ये एकूण 34 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा बोलबाला राहिला आहे. मुंबईने 34 पैकी 20 सामन्यांमध्ये चेन्नईवर विजय मिळवला आहे. तर उर्वरित 14 मॅचमध्ये चेन्नईने बाजी मारली आहे. मात्र या दोन्ही संघातील सामन्याचा अंदाज हा आकड्यांवरुन बांधणं चुकीच ठरेल, कारण दोन्ही संघात मॅचविनर खेळाडू आहेत. जे कधीही सामना एकहाती फिरवण्याची क्षमता ठेवतात.

  • 08 Apr 2023 06:10 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण स्क्वॉड

    चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

  • 08 Apr 2023 06:10 PM (IST)

    MI vs CSK IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सचा संपूर्ण स्क्वॉड

    मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.