नवी दिल्ली | मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 219 धावांचे तगडे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. पोलार्डने नाबाद 34 चेंडूत 87 धावांची विजयी खेळी साकारली. तसेच क्विंटन डी कॉकने 37, रोहित शर्माने 35 आणि कृणाल पंड्याने 32 धावा केल्या. तसेच हार्दिक पंड्याने 7 चेंडूत 2 सिक्ससह 16 धावांची निर्णायक खेळी केली. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley Stadium) करण्यात आले होते. (mi vs csk live score ipl 2021 match mumbai indians vs chennai super kings scorecard online arun jaitley stadium delhi in marathi)
कायरन पोलार्ड मुंबईच्या विजयाच्या हिरो ठरला. पोलार्डने 34 चेंडूत 6 फोर आणि 8 सिक्ससह 255.88 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 87 धावा चोपल्या. तसेच त्याआधी पोलार्डने बोलिंग करताना 2 ओव्हरमध्ये 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
मुंबईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा 200 पेक्षा अधिक विजयी धावांचे यशस्वीपणे पाठलाग केला आहे. चेन्नईने मुंबईला विजयासाठी 219 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने शेवटच्या चेंडूवर पू्र्ण केले. चेन्नईला पराभूत करत मुंबईने या मोसमातला चौथा विजय साकारला. मुंबई पॉंइट्स टेबलमध्ये 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
मुंबईने चेन्नईवर 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेले 219 धावांचे आव्हान मुंबईने 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कायरन पोलार्डने हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पोलार्डने 34 चेंडूत 87 धावांची नाबाद वादळी खेळी साकारली.
WHAT. A. WIN for the @mipaltan ??
Some serious hitting from @KieronPollard55 ( 87* off 34) as #MumbaiIndians win by 4 wickets.
Scorecard – https://t.co/NQjEDM2zGX #VIVOIPL pic.twitter.com/UAb6SYCMQz
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
मुंबईला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज आहे. मैदानात कायरन पोलार्ड आणि धवल कुलकर्णी खेळत आहेत.
मुंबईला सहावा धक्का बसला आहे. जेम्स निशाम आऊट झाला आहे. निशाम शून्यानवर बाद झाला.
मुंबईला पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्या आऊट झाला आहे. हार्दिकने 16 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने सलग 2 सिक्स लगावले.
हार्दिक पंड्याने 19 व्या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूवर सॅम करनच्या गोलंदाजीवर सलग 2 षटकार लगावले.
फॅफ डु प्लेसिसने पोलार्डला 17 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर जीवनदान दिलं. फॅफने पोलार्डचा कॅच सोडला.
पोलार्डने 18 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर फॅल्ट सिक्स लगावला.
सॅम करनने सामन्यातील 17 वी आणि त्याच्या कोट्यातील तिसरी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये त्याने केवळ 2 धावा देत 1 विकेट घेतली. सॅमने कृणाल पंड्याला एलबीडब्लूय आऊट करत चेन्नईला ब्रेक थ्रू मिळवून दिला.
सॅम करनने मुंबईला चौथा झटका दिला आहे. सॅमने कृणाल पंड्याला एलबीडबल्यू आऊट केलं. कृणालने 23 चेंडूत 32 धावांची खेळी केली.
मुंबईला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 50 धावांची गरज आहे. मैदानात कायरन पोलार्ड 55* आणि कृणाल पंड्या 32* धावांवर नाबाद खेळत आहेत. मुंबईने 16 व्या ओव्हरमध्ये 1 सिक्स, 2 फोर आणि 2 एकेरी धावांसह एकूण 16 धावा केल्या.
कायरन पोलार्डने चौकार ठोकत मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक लगावलं आहे. पोलार्डने 17 चेंडूत 3 फोर आणि 6 सिक्ससह हे अर्धशतक लगावलं.
Fastest FIFTY of #VIVOIPL 2021. @KieronPollard55 with a 17-ball half-century ??
Live – https://t.co/oRtOM7N1gh #MIvCSK #VIVOIPL pic.twitter.com/ZTcJchfwkJ
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
पोलार्डने 15 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर 103 मीटर लांबीचा गगनचुंबी सिक्स लगावला आहे.
पोलार्डने 14 व्या ओव्हरच्या चौथ्या आणि पाचव्या बोलवर लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर सलग 2 सिक्स चोपले आहेत.
पोलार्डने 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूवर रवींद्र जाडेजाच्या बोलिंगवर सलग 2 सिक्स लगावले.
कायरन पोलार्डने 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जाडेजाच्या बोलिंगवर 97 मीटर लांबीचा सिक्स लगावला आहे.
कृणाल पंड्याने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर 12 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जोरदार सिक्स लगावला.
मोईन अलीने मुंबईला तिसरा झटका दिला आहे. मोईनने आपल्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकला कॅच आऊट केलं. डी कॉकने 38 धावा केल्या.
मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. रवींद्र जाडेजाने सूर्याला आपल्या बोलिंगवर विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीच्या हाती कॅच आऊट केलं. सूर्याने 3 धावा केल्या.
मुंबईला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला आहे. शार्दुल ठाकूरने रोहितला 35 धावांवर ऋतुराज गायकवाडच्या हाती कॅच आऊट केलं.
मुंबईने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 58 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 31 तर क्विंटन डी कॉक 25 धावांवर नाबाद खेळत आहेत.
MI – 58/0 after 6️⃣ overs.#OneFamily #MumbaiIndians #MI #MIvCSK #IPL2021 @ImRo45 @QuinnyDeKock69 pic.twitter.com/w8wni3wsCc
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2021
हिटमॅन रोहित शर्माने 6 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर लुंगी एन्गिडीच्या बोलिंगवर सिक्स खेचला आहे. यासह रोहितने क्विंटन डी कॉकसह अर्धशतकी भागीदारी केली आहे.
An excellent shot from @ImRo45 as the 50-run partnership comes up between the #MumbaiIndians openers.
Live – https://t.co/oRtOM7N1gh #MIvCSK #VIVOIPL pic.twitter.com/RHB6MDquSM
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडीने मुंबईला शानदार सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी 4 ओव्हरमध्ये बिनबाद 40 धावांची भागीदारी केली आहे. रोहित 21 तर क्विंटन 17 धावांवर नाबाद आहेत.
क्विंटन डी कॉकने तिसऱ्या ओव्हरचा शेवट सिक्सने केला आहे.
रोहित शर्माने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार लगावले आहेत.
मुंबई आणि क्विंटन डी कॉकची चौकाराने सुरुवात झाली आहे. क्विंटने पहिल्याच चेंडूवर दीपक चाहरच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावला.
मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. मुंबईला विजयासाठी 219 धावांची आवश्यकता आहे.
अंबाती रायुडची नाबाद 72 धावांची खेळी, फॅफ ड्यु प्लेसिस आणि मोईन अलीच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने मुंबईला विजयासाठी 219 धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईने 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 218 धावा चोपल्या. मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
Innings Break!
Half-centuries from Moeen Ali (58), @faf1307 (50) & @RayuduAmbati (72*) propel #CSK to a huge total of 218/4 on the board.#MumbaiIndians chase coming up shortly. Stay tuned!
Scorecard – https://t.co/NQjEDM2zGX #MIvCSK #VIVOIPL pic.twitter.com/TFs5PjRCMK
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
अंबाती रायुडूने चौकार ठोकत झंझावाती अर्धशतक पूर्ण केलं आहे. रायुडूने 20 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं.
चेन्नईने 17 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 174 धावा केल्या आहेत. चेन्नईने या 17 व्या ओव्हरमध्ये 21 धावा चोपल्या. यासह अंबाती रायुडू आणि रवींद्र जाडेजा जोडीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
अंबाती रायुडूने 16 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूवर धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर सलग 2 सिक्स लगावले. या 16 व्या ओव्हरमध्ये चेन्नईने 17 धावा चोपल्या.
अंबाती रायुडूने राहुल चहरच्या बोलिंगवर 15 ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 93 मीटरचा जोरदार सिक्स लगावला.
कायरन पोलार्डने चेन्नईला सलग 2 धक्के दिले आहेत. पोलार्डने आधी फॅफ डु प्लेसिसला 50 धावांवर बाद केलं. त्यानंतर पुढील चेंडूवर सुरेश रैनाला 2 धावांवर कॅच आऊट केलं.
Two in two for @KieronPollard55 ??
Faf du Plessis and Raina depart.
Live – https://t.co/wxtOFpRIY9 #MIvCSK #VIVOIPL pic.twitter.com/7PUMqdj002
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
चेन्नईला फॅफ डु प्लेसिसच्या रुपात तिसरा धक्का लागला आहे. फॅफला कायरन पोलार्डने जसप्रीत बुमराहच्या हाती कॅच आऊट केलं. फॅफने 28 चेंडूत 4 सिक्स आणि 2 फोरसह 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.
फॅफ डु प्लेसीसने 27 चेंडूत शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. फॅफ या मोसमात सातत्याने शानदार कामगिरी करत आहे.
चेन्नईने दुसरी विकेट गमावली आहे. मोईन अली कॅच आऊट झाला आहे. मोईनला जसप्रीत बुमराहने विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हाती कॅच आऊट केलं. मोईनने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली.
फॅफ डु प्लेसीस आणि मोईन अली या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईने लवकर पहिली विकेट गमावली. यानंतर या दोघांनी शानदार फलंदाजी केली. विशेष म्हणजे या दरम्यान मोईनने जोरदार फटकेबाजी केली. मोईनने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
मोईन अलीने 33 चेंडूत शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. मोईनने या खेळीदरम्यान 3 फोर आणि 5 सिक्स लगावले. मोईनच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 4 थं अर्धशतक ठरलं.
FIFTY!
A well-made half-century for Moeen Ali off 33 deliveries ??
Live – https://t.co/NQjEDM2zGX #MIvCSK pic.twitter.com/jOlFldoGVJ
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
मोईन अलीने 9 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर राहुल चाहरच्या गोलंदाजीवर 88 मीटरचा गगनचुंबी सिक्स लगावला.यासह चेन्नईची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 49 धावा केल्या आहेत. मोईन अली 26* तर फॅफ डु प्लेसीस 17* धावांवर खेळत आहेत. चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या रुपात एकमेव विकेट गमावली.
#CSK lose one wicket in the powerplay with 49 runs on the board.
Live – https://t.co/NQjEDM2zGX #VIVOIPL #MIvCSK pic.twitter.com/acfzhK8t4y
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
मोईन अलीने तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर लेग साईडला 69 मीटर लांबीचा सिक्स लगावला.
फॅफ डु प्लेसिसने दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला.
चेन्नईला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका बसला आहे. ऋतुराज गायकवाड कॅच आऊट झाला आहे.
Boult and breakthroughs in powerplay ?
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2021
ऋतुराज गायकवाडने पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत शानदार सुरुवात केली आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. फॅफ डु प्लेसिस-ऋतुराज गायकवाड सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्लेसीस, लुंगी एन्गिडी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, सॅम करन, मोईन अली, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.
Match 27. Chennai Super Kings XI: F du Plessis, R Gaikwad, M Ali, S Raina, A Rayudu, MS Dhoni, R Jadeja, S Curran, S Thakur, D Chahar, L Ngidi https://t.co/ouG4uSjHy2 #MIvCSK #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, जेम्स नीशम, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, ट्रेन्ट बोल्ट आणि धवल कुलकर्णी.
Match 27. Mumbai Indians XI: Q de Kock, R Sharma, S Yadav, K Pandya, K Pollard, H Pandya, J Neesham, R Chahar, D Kulkarni, J Bumrah, T Boult https://t.co/ouG4uSjHy2 #MIvCSK #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईने 2 बदल केले आहेत. नॅथन कूल्टर नाइलच्या जागी मराठमोळ्या धवल कुलकर्णीला संधी देण्यात आली आहे. तर जयंत यादवऐवजी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स निशामचा समावेश करण्यात आला आहे. निशामचं मुंबईकडून पदार्पण ठरलं आहे. तर चेन्नईमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स निशामने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं आहे. नाणेफेकीआधी निशामला टीम कॅप देऊन त्याचं स्वागत करण्यात आलं.
Jimmy Neesham is all set to make his debut for the @mipaltan ?#MIvCSK #VIVOIPL pic.twitter.com/ImPFrepsjl
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नई बॅटिंग करणार आहे.
Match 27. Mumbai Indians win the toss and elect to field https://t.co/ouG4uSjHy2 #MIvCSK #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 27 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
Create your IPL Fantasy Team before today's blockbuster #MIvCSK match and avail all of your 1⃣1⃣0⃣ transfers!
Because fans joining after the 7:30 PM deadline will ONLY get 5⃣5⃣ transfers for the season.
Visit ? https://t.co/VAVN1BlyW1 pic.twitter.com/Hp1Vj8kMfk
— IPL Fantasy League (@IPLFantasy) May 1, 2021