चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL-14) चौदाव्या मोसमाचं बिगुल आज वाजणार आहे. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रेड आर्मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Banglore) यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर (MA Chidambram Stadium Chennai) खेळविण्यात येणार आहे. लागोपाठ दोन वेळा मुंबईने आयपीएलचा करंडक आपल्या नावे केला आहे. आता सलामीच्या लढतीत विजयी सलामी देऊन स्पर्धेची सुरुवात थाटात करण्यास रोहितची एमआय पलटन सज्ज आहे. तर दुसरीकडे आक्रमक खेळाडू्ंनी भरलेला बंगळुरुचा संघ मुंबईला नमवून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून द्यायला तयार आहे. दरम्यान, सलामीच्या सामन्यात दोन्ही संघात अंतिम 11 जणांमध्ये कोणकोणते चेहरे पाहायला मिळणार? हा सवाल आहे. (MI vs RCB Playing XI IPL 2021 all you need to know about Mumbai Indians and Royals Challengers Banglore match today)
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आजचा सामना चेन्नईत असून इथली विकेट (खेळपट्टी) फिरकीसाठी अनुकूल आहे. म्हणजेच प्लेइंग इलेव्हन निवडताना संघांना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागणार. मुंबई इंडियन्ससमोर ओपनिंग कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. कारण, क्विंटन डी कॉकचा क्वारन्टीन कालावधी अद्याप संपलेला नाही. दुसरीकडे देवदत्त पडिक्कल कोरोनावर मात करुन परतला आहे त्यामुळे आरसीबीची सलामीच्या खेळाडूची समस्या संपली आहे.
विराट कोहलीने आपण आयपीएलमध्ये सलामीला फलंदाजी करणार असल्याचे याआधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे आरसीबीमध्ये देवदत्त पडिक्कलसोबत सलामीचा साथीदार कोण असेल याबद्दल कोणताही संभ्रम नाही. फिरकीपटूंविरोधात विराट कोहलीचा स्ट्राइक रेट सातत्याने खाली आला आहे. 2015 मध्ये त्याचा फिरकीविरोधात 147.90 इतका स्ट्राईक रेट होता, जो 2018 पर्यंत 117.97 इतका कमी झाला आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने विराटने सलामीला फलंदाजी करणं, त्याच्यासाठी उत्तम आहे. एबी डिव्हिलियर्स मधल्या फळीत असेल, जो डेथ ओव्हर्समध्ये सुमारे 225 च्या स्ट्राइक रेटने धावा फटकावतो. आरसीबीसाठी चौथ्या क्रमांकावर त्यांचा नवा सदस्य ग्लेन मॅक्सवेल उतरेल. तर विकेटकीपिंगची (यष्टीरक्षणाची) जबाबदारी मोहम्मद अझरुद्दीनकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. तीन जलदगती गोलंदाज आणि 2 फिरकी गोलंदाजांसह विराटसेना मैदानात उतरेल. तसेच अष्टपैलू कायले जॅमिसन यंदा त्याचं आयपीएल पदार्पण करु शकतों.
दुसरीकडे, क्विंटन डीकॉक विलगीकरण कक्षात असल्याने मुंबईसमोर सलामीचा प्रश्न आहे. रोहित शर्मासोबत या सामन्यात ईशान किशनला सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियन खेळाडू ख्रिस लिन यालादेखील मुंबईचा संघ संधी देऊ शकतो. मुंबईच्या मधल्या फळीत कोणताही बदल पाहायला मिळणार नाही. तिसऱ्या नंबरवर सूर्यकुमार यादव, त्यानंतर विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड आणि मग पंड्या ब्रदर्स (हार्दिक आणि कृणाल) अशी मुंबईची फलंदाजी असेल. या सामन्यात मुंबई तीन जलदगती गोलंदाजांसह उतरु शकते.
मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, जेम्स नीशम, क्रुणाल पंड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद अझरुद्दीन (यष्टीरक्षक), डॅनियल ख्रिश्चन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जॅमिसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना आज 9 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.
तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या बवेबसाईटला देखील पाहू शकता.
(IPL 2021 mumbai Indians Vs Royal Challengers Banglore Live Streaming when & where to watch online Free in Marati 08 April 2021)
हे ही वाचा :
पीयुष चावलाला मुंबई इंडियन्सने का खरेदी केलं? रोहित शर्माने सांगितली ‘राज की बात’!
‘मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन’, गावस्कर यांच्यानंतर या दिग्गजाची भविष्यवाणी!
(MI vs RCB Playing XI IPL 2021 all you need to know about Mumbai Indians and Royals Challengers Banglore match today)