Milind Narvekar | MPLच्या गव्हर्निग काउन्सिलच्या चेअरमन पदी मिलिंद नार्वेकर आणि सुरेश सामंतांची बिनविरोध निवड

| Updated on: Dec 27, 2020 | 7:12 PM

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे नवीन जबाबदारी.

Milind Narvekar | MPLच्या गव्हर्निग काउन्सिलच्या चेअरमन पदी मिलिंद नार्वेकर आणि सुरेश सामंतांची बिनविरोध निवड
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचीव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि सुरेश सामंत (Suresh Samant) यांची MPL च्या गव्हर्निग काउन्सिलच्या चेअरमपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association)वार्षिक सर्वसाधरण सभेत (AGM) ही बिनविरोध निवड करण्यात आली. (Milind Narvekar and Suresh Samant elected unopposed as Chairman Mumbai Premier League Governing Council)

वानखेडे स्टेडियमवर वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु आहे. या सभेला एमसीएचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित आहे. तसेच या बैठकीला शरद पवारांसह अनेक दिग्गज नेतेही उपस्थित आहेत. मिलिंद नार्वेकर यांची एमपीएलच्या चेअरमनपदी निवड होणं अपेक्षित मानलं जात होतं. नार्वेकरांची निवड झाल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मोठ्या कालावधीनंतर मिलिंद नार्वेकरांचा एमसीएच्या कार्यक्षेत्रात थेट प्रवेश झाला आहे.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भूषविलं आहे.

मिलिंद नार्वेकरांचा अल्पपरिचय

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासातले आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर पडली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीएपदी निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

संबंधित बातम्या :

PHOTO | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची फोटोग्राफी

BREAKING : संजय राऊतांच्या पत्नीला ईडीचं समन्स

(Milind Narvekar and Suresh Samant elected unopposed as Chairman Mumbai Premier League Governing Council)