चंदीगड : भारताचे प्रसिद्ध धावपटू आणि फ्लाईंग सिख (Flying Sikh) या नावाने प्रसिद्ध असणारे मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ते चंदीगड येथे आपल्या घरीच उपचार घेत होते. दरम्यान त्यांची प्रकृती काहीशी बिघडल्याने त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 91 वर्षीय मिल्खा सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना रुग्णालयात थांबावं लागणार आहे. (Milkha Singh Tested Covid Positive and hospitalised for further treatment)
मिल्खा सिंग यांचा मुलगा आणि भारतीय गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंग याला याबाबतची माहिती मिळताच तो दुबईतून चंदीगड येथे परतला होता. दरम्यान त्याने PTI ला आपल्या वडिलांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. तो म्हणाला की, बाबांना आशक्तपणा जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी दिवसभर काही खाल्ले देखील नसल्याने आम्ही त्यांना रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिल्खा सिंग हे भारतभर अत्यंत प्रसिद्ध असून त्यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट देखील काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता फरहान अख्तर याने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी मिल्खा यांनी केवळ निर्मात्याकडून केवळ एक रुपया घेतला होता. विशेष म्हणजे संबधित एक रुपयाचे नाणे हे 1958 साली तयार केले होते. त्याचवर्षी मिल्खा यांनी कॉमनवेल्थ खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. हे स्वतंत्र भारताचे कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक होते.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे (Corona Cases in India) सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या सव्वादोन लाखांच्या खाली आली. कालच्या दिवसात 4 हजार 454 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले असले, तरी कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
इतर बातम्या
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI मैदानात, 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा
लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या थेट नदीत उड्या! हे कुठे घडलं?
(Milkha Singh Tested Covid Positive and hospitalised for further treatment)