Video : मिशेल जॉन्सनने युसूफ पठाणला मारला धक्का, पाहा व्हिडीओ

| Updated on: Oct 04, 2022 | 11:33 AM

धक्का मारल्यानंतर तिथं असलेल्या पंचांनी आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी केली. त्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला.

Video : मिशेल जॉन्सनने युसूफ पठाणला मारला धक्का, पाहा व्हिडीओ
Mitchell Johnson
Image Credit source: twitter
Follow us on

लीजेंड लीग क्रिकेटमध्ये (LLC) माजी खेळाडू (Former Player) पुन्हा खेळताना पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. परंतु मागच्या काही दिवसांपासून माजी खेळाडूंमध्ये सुद्धा संघर्ष वाढला आहे. अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. नुकत्याचं झालेल्या सामन्यात युसुफ पठाण (Yusuf Pathan) आणि मिशेल जॉन्सन (Mitchell Johnson) यांच्यात वाद झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ज्यावेळी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन गोलंदाजी करीत होता. त्यावेळी युसुफ पठाणला तो काहीतरी बोलला, त्यावर पठाणने त्याला जाब विचारला, सुरुवातीला मिचेल जॉन्सन लक्ष दिलं नाही. परंतु नंतर युसुफ पठाणला जोराचा धक्का मारला. त्यामुळे त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड त्याला ठोठावण्यात आला.

इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज क्वालिफायर यांच्यात रविवारी एक मॅच झाली. त्यावेळी हा वाद झाला आहे. दोघांच्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी मिचेल जॉन्सनवरती जोरदार टीका केली आहे.

धक्का मारल्यानंतर तिथं असलेल्या पंचांनी आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी केली. त्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला.