अडलेड : वनडे आणि टी 20 सीरिजनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका (India-Australia Test Series) खेळण्यात येणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्याला 17 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा पहिला कसोटी सामना ऐतिहासिक सामना असणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळण्यात येणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc)संघात परतला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि पुलोव्सकी या दोघांना दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळता येणार नाही. मात्र स्टार्क परतल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा दिलासा मिळाला आहे. कुटुंबातील सदस्याची प्रकृती स्थिर नसल्याने स्टार्कने काही दिवसांपूर्वी टी 20 मालिकेतून माघार घेतली होती. Mitchell Starc will rejoin team Australia for test series against india
Mitchell Starc will rejoin the Australia squad in Adelaide after missing the last two #AUSvIND T20Is due to a family illness.
He is in line to feature in the day/night Test ? pic.twitter.com/iOxeuJBdnI
— ICC (@ICC) December 13, 2020
“स्टार्कच्या अडचणीच्या वेळेत आम्ही त्याला साथ दिली. स्टार्कने गरजेच्या वेळेस आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवला, यामुळे आम्ही आनंदी आहोत. आता स्टार्क संघात परतला आहे. ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी दिली. स्टार्क परतल्याने संघात आनंदाचं वातावरण आहे. “स्टार्क आमचा प्रमुख गोलंदाज आहे. स्टार्कने गुलाबी चेंडूने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आम्ही स्टार्कचं संघात स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया जोश हेझलवूडने दिली.
स्टार्कने डे-नाईट कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूने सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. स्टार्कने आतापर्यंत एकूण 42 विकेट्स घेतल्या आहेत. स्टार्कनंतर नॅथन लायनने गुलाबी चेंडूने 28 विकेट्स घेतल्या आहेत.
स्टार्कच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. टीम इंडियाला स्टार्कसह पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड, नॅथन लायन या गोलंदाजाच्या माऱ्याचा सामना करावा लागणार आहे. त्यातच पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतणार आहे. यामुळे टीम इंडियाचा कसोटी मालिकेत चांगलाच कस लागणार आहे.
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज
संबंधित बातम्या :
IND vs AUS : रोहितबाबत बीसीसीआयची मोठी अपडेट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी द्यावी लागणार आणखी एक फिटनेस टेस्ट क्रिकेट
Mitchell Starc will rejoin team Australia for test series against india