मुंबई : भारतीय महिला संघाचा (Indian Women Cricket team) कणा असलेली मिताली राज हिने (Mithali Raj ) आंतरराष्ट्रीय क्रिकेमधील 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारी ती मिताली दुसरी महिला बॅट्समन ठरली आहे. साऊथ आफ्रिकेविरोधातल्या तिसऱ्या मॅचमध्ये तिने ही अजोड कामगिरी केलीय. प्रत्येक भारतीय तिच्या या यशावर गर्व करतोय. (Mithali Raj international Cricket 10 Housand Runs Became 2nd batsman)
भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिताली राज नावाचं वादळ गेल्या दोन दशकांपासून घोंघावत आहे. 1999 मध्ये तिने क्रिकेट विश्वात पदार्पण केलं तेव्हापासून तिने आजतागायत पाठीमागे वळून पाहिलं नाही. ओपनिंग येऊन तिने खोऱ्याने रन्स केले, कर्णधार म्हणून भारताचा तिरंगा जगात फडकवला तर मधल्या फळीत फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला कित्येक वेळा हाराकिरी पत्करायला लावली.
भारताचा साऊथ आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात तिने 50 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 36 रन्स केल्या. याचसोबत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज दुसरी महिला फलंदाज आहे. मितालीने 311 वी मॅच खेळताना ही कमाल केली आहे. तिने आतापर्यंतच्या आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 75 अर्धशतक ठोकलीत तसंच तिच्या नावावर 8 शतके देखील आहेत.
मितालीअगोदर इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्स हिने 10 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केलाय. तिने 309 मॅचमध्ये 10 हजार 273 रन्स केले. यामध्ये 67 अर्धशतकांसह 13 शतकांचा समावेश आहे.
महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ दोनच महिला खेळाडूंनी 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. एक म्हणजे एडवर्डस आणि दुसरी म्हणजे मिताली राज… या दोघींमध्ये तीन समानता आहेत.
1) दोघींनीही साऊथ आफ्रिकेविरुद्ध आपल्या 10 धावांचा टप्पा ओलांडला.
2)दोघांनीही दहा हजार धावा पार करताना आफ्रिकेची लौरा पदार्पण करत होती. तुम्ही म्हणाल कसं काय तर एडवर्डसने 10 हजार धावा पार केल्या तेव्हा लौराने एका सिरीजच्या निमित्ताने डेब्यू केला होता. तर मितालीने 10 हजार धावा करताना लौराने कर्णधार म्हणून डेब्यू केलाय किंबहुना कर्णधारपदाची सूत्रं हातात घेतली आहेत.
3) तिसरी आणि शेवटची समानता म्हणजे दोघींनीही 10 हजार धावांचा टप्पा गाठताना चौकार मारत विक्रमाला गवसणी घातलीय.
(Mithali Raj international Cricket 10 Housand Runs Became 2nd batsman)
हे ही वाचा :