Raj Thackrey : राज ठाकरेंची वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशसाठी खास पोस्ट, म्हणाले – एक मोठी परंपरा…

| Updated on: Dec 13, 2024 | 10:25 AM

भारताच्या डोमराजून गुकेश अर्थात डी गुकेश याने काल इतिहास घडवला. बुद्धिबळाच्या पटावरचा तो नवा राजा ठरला आहे. तीन आठवडे चाललेल्या बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये डी गुकेश याने गतविजेता चॅम्मियन चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत 64 घरांच्या या पटावर आपलं नाव कोरलं

Raj Thackrey : राज ठाकरेंची वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशसाठी खास पोस्ट, म्हणाले - एक मोठी परंपरा...
राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल
Follow us on

भारताच्या डोमराजून गुकेश अर्थात डी गुकेश याने काल इतिहास घडवला. बुद्धिबळाच्या पटावरचा तो नवा राजा ठरला आहे. तीन आठवडे चाललेल्या बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये डी गुकेश याने गतविजेता चॅम्मियन चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत 64 घरांच्या या पटावर आपलं नाव कोरलंय. विश्वनथन आनंद यांच्यानंतर डी गुकेश हा भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला असून प्रत्येक भारतीयासाठी हा अत्यंत अभिमानाचा असा क्षण आहे. सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाअंतिम सामन्यात डी गुकेशने ही अभिमानास्पद कामगिरी करत 14 व्या डावात विजय मिळवत नवा विक्रम रचला.त्याच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर तो ट्रेंड होत आहे.

त्याच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्याचे भरभरून कौतुक केलं आहे. X या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट लिहून राज ठाकरेंनी डी गुकेशचे अभिनंदन करत त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे.

काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट ?

‘ भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगजेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छा ‘ असं राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद करत डी गुकेशचं कौतुक केलंय.

 

ठरला सर्वात तरूण विश्वविजेता

बुद्धिबळाची ही चॅम्पियनशिप जिंकत डी गुकेशने अनेक विक्रम रचले. वर्ल्ड चॅम्पियन होणारा तो सर्वात तरूण बुद्धीबळपटू ठरला आहे. गुकेशने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. भारताला 12 वर्षांनंतर नवा चॅम्पियन मिळाला आहे. डी गुकेश याच्याआधी 2012 साली विश्वनाथन आनंद हे चेस मास्टर ठरले होते. त्याने 14 डावांनंतर डिंग लिरेन याचा साडेसात आणि साडेसहा अशा फरकाने पराभव केला आणि वर्ल्ड चॅम्पियन बनत नवा विक्रम रचला.

कोण आहे डी गुकेश ?

चेसमधील सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला डी गुकेश हा मूळचा चेन्नईतील आहे. त्याची आई मायक्रोबायोलॉजिस्ट तर वडील डॉक्टर आहेत. मात्र गुकेश याला बुद्धिबळाची आवड होती. त्याने अवघ्या 7 व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केला आणि 11 वर्षांनी तो वयाच्या 18 व्या वर्षी जगज्जेता बनला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताचं नाव अभिमानाने उंचावल असून सोशल मीडियावरही तो ट्रेंडमध्ये आहे.