मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याचा आज 42 वा वाढदिवस आहे. टीम इंडियाच्या (Team India) एखाद्या खेळाडूला उत्कृष्ट फिल्डींगचा पुरस्कार द्यायचा ठरला, तर चाहते पहिल्यांदा कैफचं नाव घेतील. सौरव गांगुलीच्या (ganguly) नेतृत्वात कैफने चांगली खेळी केली. एकवेळ अशी खेळी केली की, सौरव गांगुली टी-शर्ट काढून पॅव्हेलियनमध्ये नाचला.
मोहम्मद कैफ हा खेळाडू असा आहे की, त्याला घरातून सगळं मार्गदर्शन मिळालं आहे. कारण कैपचे वडिल उत्तर प्रदेश आणि इतर रेल्वेच्या टीममधून क्रिकेट खेळले आहेत. त्याचबरोबर कैफचा मोठा भाऊ सुद्धा उत्तरप्रदेश आणि इतर ठिकाणी क्रिकेट खेळला आहे.
अनेक खेळाडू एकदिवसीय सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण करतात. परंतु मोहम्मद कैफने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याचबरोबर त्याला एकदिवसीय सामन्यात संधी मिळायला दोन वर्षे लागली.
मोहम्मद कैफला अझरुद्दीन, सचिन तेंडूलकर सारख्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. कारण तो क्रिकेटमध्ये यांना आदर्श मानतो.
मोहम्मद कैफ देशांतर्गत क्रिकेट अधिक खेळला. 2014 मध्ये उत्तरप्रदेश टीमचं कर्णधार पद त्यांच्याकडे होतं. त्यानंतर तो आंध्रप्रदेश क्रिकेट टीमचा कर्णधार होता. 2015-16 मध्ये तो छत्तीसगड टीमचा कर्णधार होता.
मोहम्मद कैफने फिल्डींग आणि चांगल्या बॅटिंगमुळे अनेकदा टीम इंडियाचा विजय मिळवून दिला आहे. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग ही जोडी त्यावेळी अधिक प्रसिद्ध होती.