आशिया चषकात (Asia Cup 2022) खराब कामगिरी केल्यापासून टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांवरती जोरदार टीका झाली. कारण त्यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. विशेष म्हणजे महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांमुळे आशिया चषकातून बाहेर पडावं लागलं. त्यावेळी मोहम्मद शमी (Mohammed Shami) पुर्णपणे तंदुरुस्त असताना त्याला घरी का बसवलं आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
काही दिवसांनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी मोहम्मद शमी पर्थमध्ये दाखल होणार आहे. कोरोना झाल्यामुळे तो अद्याप टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाकडे रवाना झालेला नाही. परंतु तो थोड्या दिवसात टीम इंडियासोबत असेल अशी माहिती मिळाली आहे.
मोहम्मद शमी हा अनुभवी गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह हा जखमी झाल्यापासून त्याची जागा कोण घेणार अशी चर्चा सुरु आहे. पण मोहम्मद शमीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
आजारातून सावरलेल्या मोहम्मद शमीने काही चाचण्या पास केल्यातर तो जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकतो.