नवी दिल्ली: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिका भारताला जिंकायची असेल तर फलंदाजांसोबत गोलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे. भारतीय गोलंदाजी गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. भारताकडे मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. मात्र, भारताचा सर्वात वेगवान आणि धोकादायक गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी प्रसिद्ध आहे. त्याच्या गोलंदाजी समोर मोठ्या फलंदाजाची देखील अडचण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भारताचे दिग्गज कसोटीपटू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर देखील शमीच्या गोलंदाजीचे फॅन आहेत.
मोहम्मद शमी भारताच्या गोलंदाजीमधील महत्वाचा भाग आहे. त्याने टाकलेल्या बाऊंसर्ससमोर खेळणं फलंदाजांना अवघड जाते.मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचा दरारा फलंदाजांच्या मनात असल्याचे यापूर्वीच्या सामन्यांमध्ये दिसून आले आहे. मोहम्मद शमी कमी धावा देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजीची मदार मोहम्मद शमीवर आहे. या मालिकेत मोहम्मद शमीच्या निशाण्यावर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज असतील. ऑस्ट्रेलियाच्या फंलदांजांना लवकर तंबूत पाठवण्याची जबाबदारी मोहम्मद शमीवर आहे. (Mohammed Shami bowling create challenge against Australia)
बिबट्यासारखं झेपावत बळी घेण्याची क्षमता
भारताचे दिग्गज कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी यापूर्वी मोहम्मद शमी बिबट्यासारखी झडप घेऊन फलंदांजाची शिकार करतो, असं म्हटलं होते. मोहम्मद शमीच्या भात्यात बाऊंसर्स, रिवर्स स्विंग आणि चेंडू हवेत वळवण्याची कला आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीत मोहम्मद शमी सर्वोत्कृष्ट ठरतो. मोहम्मद शमी बाऊंसर्सचा मारा करतो तेव्हा फलंदाज थरथर कापतात. मागील वर्षी बांग्लादेशचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत शमीनं बाऊंसर्सचा मोठ्या प्रमाणात मारा केला होता. या मालिकेत त्यांनी 9 विकेट घेतल्या होत्या. मोहममद शमीनं काही दिवसांपूर्वी बांग्लादेशचे फलंदाज बाऊंसर्स न टाकण्याची विनंती करत असल्याचे सांगितले होते. मोहम्मद शमीनं न्यूझीलंडविरोधातील 2 सामन्यांमध्ये 5 विकेट घेतल्या. गेल्या 10 सामन्यांमध्ये मोहम्मद शमीनं 38 विकेट घेतल्या आहेत. (Mohammed Shami bowling create challenge against Australia)
एकदिवसीय सामने आणि टी-20 सामन्यांपेक्षा कसोटी सामन्यांमध्ये मोहम्मद शमीची गोलंदाजी आक्रमक ठरते. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचा सामना करणं आव्हानत्मक ठरणार आहे. भारताच्या मागील दौऱ्यात मोहम्मद शमीनं जसप्रीत बुमराह पाठोपाठ विकेट घेतल्या होत्या. बुमराहने 21 तर शमीनं 16 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सराव सामन्यात शमीनं पाच विकेट घेतल्या आहेत. शमीनं आतापर्यंत 49 कसोटी सामने खेळले आहेत. आतापर्यंत त्यानं 180 विकेट घेतल्या आहेत. या मालिकेत शमीला कसोटी सामन्यांचे अर्धशतक आणि 200 विकेटचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. मोहम्मद शमीचा सराव सामन्यातील फॉर्म पाहता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. (Mohammed Shami bowling create challenge against Australia)
Photo : प्रीमियर लीगवर कोरोनाचं संकट; स्टेडियमचे दरवाजे चाहत्यांसाठी पुन्हा बंदhttps://t.co/FLVapkHvbe#PremierLeague
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
संबंधित बातम्या:
IND vs AUS : पंतची हिंटिंग की साहाची कीपिंग? कप्तान कोहली कोणाची निवड करणार?
IND vs AUS A : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील दुसरा सराव सामना अनिर्णित
(Mohammed Shami bowling create challenge against Australia)