Video : मोहम्मद शमीच्या आठवणीत हसीन जहाँची झोप उडाली?, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलात?

| Updated on: Apr 24, 2021 | 9:57 AM

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed shami) आणि त्याची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) यांच्यात कौटुंबिक वाद सुरु आहेत. (Mohammed shami Wife hasin jahan post Dance Video On Social Media)

Video : मोहम्मद शमीच्या आठवणीत हसीन जहाँची झोप उडाली?, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलात?
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ
Follow us on

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed shami) आणि त्याची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) यांच्यात कौटुंबिक वाद सुरु आहेत. हे वाद गेली अनेक वर्ष सुरु आहेत. यादरम्यान शमीच्या पत्नीने त्याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. आतापर्यंत तरी आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत पण वारंवार शमीची पत्नी हसीन जहाँ चर्चेत असते. आताही सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन ती चर्चेत आली आहे. एका गाण्यावर डान्स करताना तिला शमीची आठवण येतीय का? असा प्रश्न या निमित्ताने क्रिकेट फॅन्सना पडला आहे. (Mohammed shami Wife hasin jahan post Dance Video On Social Media)

हसीनला मोहम्मद शमीची आठवण?

हसीन जहाँचे फोटो असो किंवा व्हिडीओ किंबहुना आरोप… ती आपल्या वागण्याने नेहमी चर्चेत असते. तिने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय. ज्यामध्ये ती ‘जोगी जी याद सतावे, जोगी जी नींद न आवे’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. ज्याप्रकारे तिने गाण्यावर डान्स करताना एक्सप्रेशन दिले आहेत, त्यावरुन तिला मोहम्मद शमीची आठवण येत आहे, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. तश्या प्रकाराच्या कमेंटही नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.

हसीन तुला मोहम्मदची आठवण येतेय का? असे प्रश्न चाहत्यांनी विचारले आहेत. तसंच तिच्या व्हिडीओखाली अनेकांनी तिच्या विरोधी कमेंट लिहित तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मोहम्मदचं आयुष्य तुझ्यामुळे धुळीला मिळालं, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

हसीन जहाँ ट्रोल

मोहम्मद-हसीनचा तलाक झाला नाही

मोहम्मद शमीसोबत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हसीन तिच्या मुलीसोबत मोहम्मदपासून वेगळं राहते. उभयतांमध्ये जवळपास दोन ते तीन वर्षांपासून वाद आहेत. ते जरी वेगळे राहत असले तरी त्यांनी आणखी तलाक घेतलेला नाहीय.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं लग्न 7 एप्रिल 2014 साली झालं. ज्यानंतर दुसऱ्या महिलांशी त्याचे संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप हसीनने केला होता. हसीनने मोहम्मदवर बलात्काराचा आरोप देखील केला होता.

(Mohammed shami Wife hasin jahan post Dance Video On Social Media)

हे ही वाचा :

Video : चहलच्या बायकोचा भांगडा पाहिलात का?, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

IPL 2021 : बायकोच्या दिलखेचक अदांवर जसप्रीत फिदा, रोमँटिक कमेंट करत सौंदर्याचं कौतुक!

IPL 2021 : नाद करा पण माझा कुठं?, रैना-कोहलीला पछाडत रोहित शर्माचा ऐतिहासिक रेकॉर्ड!