सिडनी: भारतीय संघ (Team India) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India tour of Australia) आहे. या दौऱ्यात जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याची देखील निवड झाली आहे. त्यामुळे सिराज सध्या भारतीय संघासमवेत सिडनी येथे क्रिकेटचा सराव करतोय. सिराजचे वडील मोहम्मद गौस (53) यांचं 20 नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. फुफ्फुसांशी संबंधित आजाराने ते त्रस्त होते. मोहम्मद सिराज यानं वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी भारतात न परतण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी सतत क्रिकेट खेळावं हे वडिलांचं स्वप्न होतं, ते पूर्ण करत असल्याचे मोहम्मद सिराज यानं बीसीसीआय टीव्हीशी बोलताना सांगितले. (Mohammed Siraj express feelings after death of his father)
मोहम्मद सिराज यांनं बीसीसीआय टीव्हीसोबत बोलताना वडिलांच्या निधनानंतर कर्णधार विराट कोहली यांनं धीर दिल्याचे सांगितले. ” माझा मोठा आधार आता सोबत नाही, वडिलांची मी भारतासाठी खेळत राहावं,अशी भावना होती. आता मी हा विचार करतो की वडील जगात नाहीत मात्र ते कायम माझ्या सोबत आहेत. हा विचार करुन चांगलं प्रदर्शन करण्याचा निर्धार करतो”, असं सिराज म्हणाला.
मोहम्मद सिराजचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी त्यानं वनडे आणि टी-20 मध्ये यापूर्वीचं भारताचं प्रतिनिधीत्व केले आहे. “वडिलांच्या मृत्यूनंतर कठिण प्रसंगी टीममधील सहकाऱ्यांनी धीर दिल्यामुळं बरं वाटलं, त्यांनी कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ दिली नाही. विराट कोहलीने देखील ताण घेऊ नको, असं सांगितले होते. तुझ्या वडिलांचे तू स्वप्न पूर्ण करत आहेस. या प्रसंगी तू स्वत:ला सावरलं तर कुटुंबासाठी चांगलं राहील, असं विराट कोहलींनं सांगितल्यामुळं बरं वाटलं”, असं मोहम्मद सिराज म्हणाला. (Mohammed Siraj express feelings after death of his father)
“आज तुझे वडील गेले आहेत, एक दिवस मी जाईन, तुलाही जावं लागणार आहे. तु तिथेच थांब, असं आईनं सांगितल्याची माहिती सिराजनं दिली. “वडिलांचे जे स्वप्न होते ते पूर्ण कर, भारतासाठी खेळत राहा, चांगलं प्रदर्शन कर असं आईनं सांगितले” असं मोहम्मद सिराज म्हणाला.
मोहम्मद सिराजने भारतासाठी एक एकदिवसीय सामना आणि तीन टी-20 सामने खेळले आहेत. त्याने तीन टी-20 सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्याने खेळलेल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नव्हता. तर आयपीएलमध्ये 35 सामन्यांमध्ये त्याने 39 विकेट्स मिळवल्या आहेत. 32 धावात 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच 2020 च्या आयपीएलमध्ये त्याने एकाच सामन्यात दोन निर्धाव षटकं टाकण्याचा रेकॉर्ड केला होता. असा रेकॉर्ड करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.
Want to fulfill my father’s dream: Siraj
The fast bowler speaks about overcoming personal loss and why he decided to continue performing national duties in Australia. Interview by @Moulinparikh
Full interview ?https://t.co/xv8ohMYneK #AUSvIND pic.twitter.com/UAOVgivbx1
— BCCI (@BCCI) November 23, 2020
संबंधित बातम्या:
टीम इंडियाचा शिलेदार मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन, कोरोनाच्या नियमांमुळे अंत्यसंस्कारांना मुकणार
IPL 2020, KKR vs RCB : मोहम्मद सिराजची धडाकेबाज कामगिरी, ठरला पहिलाच गोलंदाज
(Mohammed Siraj express feelings after death of his father)