नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यात कसोटी मालिका पार पडत आहे. पहिल्याच कसोटीत पाहुण्या संघाने भारताला 227 धावांनी धूळ चारली आहे. अशातच भारत-इंग्लंड टेस्ट मॅच सिरीजचं नाव तेंडुलकर-कुक सिरीज (Tendulkar Cook Trophy) ठेवा, अशी मागणी इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने (Monty panesar) केली आहे. (Monty panesar Demand India England test Series to be name As Tendulkar Cook Trophy)
Eng v India test series should be called “Tendulkar Cook trophy ” because both have highest test runs for their countries,they played a lot against eachother and we know Tendulkar is the biggest legend and we dont have a series named after him. @englandcricket @BCCI #INDvENG
— Monty Panesar (@MontyPanesar) February 10, 2021
मॉन्टी पानेसरने त्याच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्विट केल. ज्यामध्ये त्याने उभयतांमध्ये होणाऱ्या कसोटी सिरीजचं नाव तेंडुलकर-कुक सिरीज ठेवण्याची मागणी केली आहे. मॉन्टी पानेसरने केलेलं ट्विट खूपच व्हायरल होतंय. क्रिकेट फॅन्सही त्याच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.
मॉन्टी पानेसरने बीसीसीआयला टॅग करत तेंडुलकरच्या खेळाचं महत्त्व आणि त्याच्या अफलातून इनिंग्जची आठवण करुन दिलीय. त्याने म्हटलंय, ” सचिन तेंडुलकरला आपण सगळेच क्रिकेटचा देव म्हणून ओळखतो. तेंडुलकरने भारतासाठई अनेक विस्मरणीय खेळी केल्या आहेत. परंतु आपल्याजवळ त्याच्या नावाची एकही सिरीज खेळली जात नाही. त्यामुळे आता इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट सिरिजचं नाव तेंडुलकर-कुक ठेवलं जावं.
मॉन्टी पानेसरने केलेल्या मागणीवर काही चाहत्यांनी त्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे तर काही चाहत्यांनी मात्र त्याची फिरकी घेतलीय. ‘काही वर्ष थांबा या सिरीजचं नाव कोहली-रुटही असेल’, असं म्हणत एका चाहत्याने मॉन्टी पानेसरला चिमटा काढलाय. तर एका चाहत्याने मात्र मॉन्टीला उलटप्रश्न करत या सिरीजचं नाव कपील देव-बॉथम ठेवायला काय हरकत आहे, असा सवाल विचारलाय.
दरम्यान, पाहुण्या संघाने भारताला मायभूमीत पराभूत करण्याची किमया साधलीय. याअगोदरही त्यांनी अशी कामगिरी केली होती. परंतु यावेळी तब्बल 227 धावांनी इंग्लंडने भारताला पराभूत केलंय. चेन्नईच्या मैदानावर भारताला तब्बल 22 वर्षांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
(Monty panesar Demand India England test Series to be name As tendulkar Cook Trophy)
हे ही वाचा :
Virat Kohli | ‘रनमशीन’ कॅप्टन विराट कोहलीची विक्रमाला गवसणी, क्लाइव लॉईड यांना पछाडलं