न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच धोनीने इतिहास रचला

| Updated on: Jul 09, 2019 | 5:52 PM

यष्टीरक्षक म्हणून 350 वन डे सामना खेळणारा धोनी पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. विश्वचषक सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना धोनीने हा विक्रम नोंदवला.

न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच धोनीने इतिहास रचला
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचलाय. धोनीचा 350 वा वन डे सामना आहे. यष्टीरक्षक म्हणून 350 वन डे सामना खेळणारा धोनी पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. विश्वचषक सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना धोनीने हा विक्रम नोंदवला.

यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक सामने खेळणारा धोनी जगातील दुसरा खेळाडू बनलाय. हा विक्रम अजूनही श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्याच नावावर आहे. संगकाराने 360 सामने खेळले आहेत, तर धोनीच्या नावावर 350 सामने आहेत.

यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक सामने

कुमार संगकारा – 360 सामने

महेंद्रसिंह धोनी – 350 सामने

मार्क बाऊचर – 294 सामने

एडम गिलख्रिस्ट – 282 सामने

मोईन खान – 211 सामने

यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक फलंदाजांना माघारी पाठवणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनी सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टम्पच्या मागे धोनीने आतापर्यंत 443 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात 320 झेल आणि 123 स्टम्पिंगचा समावेश आहे. कुमार संगकाराच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये 482 विकेट्स आहेत.

संगकाराने 383 झेल आणि 99 स्टम्पिंग केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टने 472 फलंदाजांना माघारी पाठवलंय, ज्यात 471 झेल आणि 55 स्टम्पिंगचा समावेश आहे. स्टम्पिंग करणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये धोनी सर्वात पुढे आहे. 123 स्टम्पिंगसह धोनीच्या नावावर विश्वविक्रम जमा आहे.