अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेलं जगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान मोटेरा स्टेडियमचं (Motera Cricket Stadium) नाव बदलण्यात आलं आहे. हे मैदान आता नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) म्हणून ओळख जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. यापूर्वी या मैदानाचं नाव सरदार पटेल स्टेडियम असं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन झालं. यावेळी अमित शाह, केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल उपस्थित होते. (Motera stadium will now be called Narendra Modi stadium)
सर्वात मोठ्या या मैदानात आज भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England 3rd Test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. मोटेरा स्टेडिअम हे पूर्णपणे नव्याने बांधण्यात आले आहे. यात 1 लाख 32 हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्टेडिअमचा इतिहास जुना आहे. मोटेरा स्टेडिअम बनवण्यासाठी गुजरात सरकारने 50 एकरची जमीन दान दिली होती. त्यानंतर 1982 मध्ये मोटेरा स्टेडिअम बनवण्यात आले. त्यानंतर 1983 नंतर या स्टेडिअमवर क्रिकेटचे सामने होत होते.
As CM, he used to say Gujaratis must also progress in 2 fields-sports&armed forces. He took charge of GCA on my request&promoted sports here. His vision was that world’s largest cricket stadium be built here. This 1,32,000-seater stadium will be known as Narendra Modi Stadium: HM pic.twitter.com/bn2BNcLA57
— ANI (@ANI) February 24, 2021
मात्र 2015 मध्ये हे स्टेडिअमचे रुपडं पालटण्यासाठी या ठिकाणी क्रिकेटचे सामन्याचे आयोजन रोखण्यात आले.या स्टेडिअमला पूर्णपणे नव रुप देण्यात आले आहे. यासाठी 750 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या स्टेडिअमला नवे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 4 वर्षांहून अधिक कालावधी लागला.
साधारणपणे कोणत्याही स्टेडियममध्ये 2 ड्रेसिंग असतात. पण मोटेरामध्ये तब्बल 4 ड्रेसिंग रुम आहेत. प्रत्येक ड्रेसिंग रुममध्ये सुसज्ज जीमची सोय आहे. या स्टेडियमध्ये एकूण 55 क्लबहाऊस आहेत. त्यात 3 प्रॅक्टीससाठीची मैदानं आणि 50 खोल्यांचा समावेश आहे.
ऑलिम्पिकसाठी बनवतात तसा स्विमींग पूलसुद्धा या स्टेडियममध्ये आहे. इनडोअर क्रिकेट अकादमी, बॅडमिंटन, टेनिस कोर्ट, टेबल-टेनिस एरीना, स्क्वॅश एरीना, 3D प्रोजेक्टर असलेलं थिएटरही या स्टेडियममध्ये आहे. या स्टेडियममध्ये फ्लड लाइटऐवजी LED लाइट्स वापरलेत. यामुळे कशाचीच सावली दिसत नाही. अनेकदा खेळाडूंना सामन्यादरम्यान सावलीमुळे अडथळा निर्माण होता.
मोटेरा स्टेडियमच्या मैदानात 4-6 नव्हे तर तब्बल 11 खेळपट्ट्या आहेत. लाल, काळी आणि दोन्ही प्रकारची माती अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या या खेळपट्ट्या आहेत. यातल्या काही वेगवान तर काही फिरकी गोलंदाजांस मदतशीर आहेत. स्पर्धेची, मॅचची गरज बघून खेळपट्टी निवडता येणार आहेत.
हे स्टेडियम साबरमती नदीच्या किनाऱ्यावर एकूण 63 एकरावर बांधण्यात आलं आहे. या स्टेडियमची प्रेक्षक संख्या ही तब्बल 1 लाख 10 हजार इतकी असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आज अमित शाह यांनी ही संख्या 1 लाख 32 हजार प्रेक्षक बसू शकतील असा दावा केला. प्रेक्षक संख्येच्या बाबतीत मोटेराने ऑस्ट्रेलियाच्या एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला पछाडलं आहे. एमसीची प्रेक्षक संख्या ही 1 लाख इतकी आहे.
हम सभी देशवासियों के लिए गर्व की बात है कि एक लाख बत्तीस हजार दर्शकों की क्षमता के साथ मोटेरा का यह स्टेडियम आज विश्व का सबसे बड़ा क्रिकेट स्टेडियम बन गया है।
— President of India (@rashtrapatibhvn) February 24, 2021
संबंधित बातम्या
(Motera stadium will now be called Narendra Modi stadium)