MS Dhoni News: धोनी एक उत्कृष्ट फिनिशर होता, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मायकेल बेवनकडून धोनीची स्तुती

| Updated on: Jun 19, 2022 | 9:51 AM

2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने 2006 ते 2015 अशी सलग 10 वर्षे आयसीसी रँकिंगवर राज्य केले असं म्हणायला हरकत नाही. 10 वर्षात हा खेळाडू कधीच टॉप 10 मधून बाहेर पडला नाही.

MS Dhoni News: धोनी एक उत्कृष्ट फिनिशर होता, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मायकेल बेवनकडून धोनीची स्तुती
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मायकेल बेवनकडून धोनीची स्तुती
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) तुलना जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये आजही केली जाते. शेवटच्या षटकांमध्ये धोनी मैदानात उतरेल त्यावेळी विरोधी संघाच्या गोलंदाजांवर दडपण वारंवार स्पष्टपणे दिसले आहे. धोनीला कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकण्याची चांगली जाण होती. त्यामुळेच त्याच्या निवृत्तीनंतरही दिग्गज क्रिकेटपटू धोनीचेच उदाहरण देऊन इतर क्रिकेटपटूंना चांगला रस्ता दाखवतात. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मायकेल बेवनने (michael bevan) धोनीच्या आयसीसी (ICC) क्रमवारीचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. त्याच्यासारखा चांगला क्रिकेटर बनण्यासाठी खेळाडूंना काय आवश्यक आहे ते त्याने सांगितले आहे. भारतात देखील अनेकदा धोनीचे उदाहरण दिले जाते.

10 वर्षात हा खेळाडू कधीच टॉप 10 मधून बाहेर पडला नाही

2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने 2006 ते 2015 अशी सलग 10 वर्षे आयसीसी रँकिंगवर राज्य केले असं म्हणायला हरकत नाही. 10 वर्षात हा खेळाडू कधीच टॉप 10 मधून बाहेर पडला नाही. यादरम्यान धोनी दोन वेळा अग्रस्थानी होता. तसेच एकूण 7 वेळा टॉप 5 मध्ये होता. आयसीसी क्रमवारीत सलग 10 वर्षे राज्य करणारा धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

धोनी एक उत्कृष्ट फिनिशर होता

धोनीच्या आयसीसी क्रमवारीचे छायाचित्र पोस्ट करत बेवनने लिहिले आहे की, धोनी एक उत्कृष्ट फिनिशर होता. त्याच्यासारखा चांगला खेळाडू होण्यासाठी तुम्हाला उत्कृष्ट गुणांची जोड हवी आहे. तुम्हाला रणनीती ठरविता आली पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत सर्वोत्तम शॉट निवडणे हे खूप महत्त्वाचे आहे. ती खेळी तुम्हाला सामने जिंकण्यास मदत करते असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

धोनीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्द खूप चांगली राहिली आहे. त्याने 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने अनुक्रमे 4876, 10773 आणि 1617 धावा केल्या. धोनीची एकदिवसीय सामन्यांमध्ये सरासरी 50.58 आहे, तर कसोटी 38.09, तर टी20 37.60 सरासरीने धावा केल्या आहेत.